Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

लाल महालात ‘लावणी’ करणं पडलं महागात! वैष्णवी पाटीलसह चौघांविरोधात गुन्हा दाखल

चार दिवसांपूर्वी वैष्णवी पाटील आणि तिच्या साथीदारांनी लाल महालातील मोकळ्या जागेत नृत्य करत शूटिंग करून व्हिडीओ फेसबुक वर व्हायरल केले होते.

गोपाळ मोटघरे

पुणे - लाल महालात नृत्य करणाऱ्या वैष्णवी पाटीलसह चौघांविरोधात फरासखाना पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आहे. चार दिवसांपूर्वी वैष्णवी पाटील आणि तिच्या साथीदारांनी लाल महालातील मोकळ्या जागेत नृत्य करत शूटिंग करून व्हिडीओ फेसबुक वर व्हायरल केले होते. त्यानंतर समाज माध्यमातून तिच्यावर मोठ्या प्रमाणात टिका होत होती. संभाजी ब्रिगेड सह पुरोगामी संघटनेने या घटने विषयी आक्रमक होत आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील पाहा -

काय आहे प्रकरण ?

लाल महालात रिल्ससाठी लावणी नृत्य शूट झाल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला होता. तसंच ब्रिगेडने या शूटवर आक्षेप घेतला. संभाजी ब्रिगेडने याबाबतची तक्रार पोलीस आयुक्तांसह महानगर पालिका आयुक्तांकडे केली होती.

लाल महाल उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे महानगरपालिकेने (PMC) बंद ठेवला आहे. हजारो पर्यटक जिजाऊ-शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी येत असतात. मात्र पुणे महानगरपालिका आणि तिथल्या सुरक्षा रक्षकांकडून लाल महाल बंद ठेवण्यात आलेला आहे. मात्र दुसरीकडे जिजाऊ-शिवरायांच्या या लाल महालात रिल्स काढण्याच्या नादात चित्रपट आणि तमाशातील गाण्यांवरती नृत्य करत या ठिकाणी रिल्स शूट केल्या जात आहेत.

या ठिकाणी असे नाचगाण्यांचे प्रकार हे लाल महालाची बदनामी करणारे असून वैष्णवी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी हे गाणं त्या ठिकाणी शूट केलं. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. त्यानंतर वैष्णवी पाटीलसह तिघांवर फरासखाना पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

SCROLL FOR NEXT