Panvel Car Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Express Way Accident: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर कारचा भीषण अपघात, पोलिस उपनिरिक्षकाचा मृत्यू

Panvel Car Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या पनवेलजवळच्या (Panvel) हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. हा पोलिस मुंबईतील विक्रोळी येथील पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत होता. या अपघाताचा तपास रायगड पोलिसांकडून सुरू आहे.

Priya More

सचिन कदम, रायगड

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune Express Way) कारला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातामध्ये पोलिस उपनिरिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या पनवेलजवळच्या (Panvel) हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. हा पोलिस मुंबईतील विक्रोळी येथील पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत होता. या अपघाताचा तपास रायगड पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास कारला भीषण अपघातात झाला. या अपघातामध्ये पोलिस उपनिरिक्षकाचा जागीच मृत्य झाला. सुरज चौगुले (55 वर्षे) असे या मृत पोलिस उपनिरिक्षकाचे नाव आहे. सुरज चौगुले हे मुंबईतल्या विक्रोळीमधील पार्क साईट पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत होते. मुंबई-पुणेएक्सप्रेस वे वरून ते पुण्यावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते.

पुण्यावरून मुंबईच्या दिशेने येताना सुरज चौगुले यांच्या कारवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची कार पहिल्या लेनच्या रेलिंगवर जाऊन जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की ही रेलिंग कारमध्ये घुसली. या अपघातामध्ये सुरज चौगुले गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला. या अपघाताची माहिती मिळताच रायगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरज चौगुले यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT