Mumbnai News  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : व्यावसायिक अपहरण प्रकरणात 3 आरोपींना 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, आमदार प्रकाश सुर्वेंचा मुलगा फरार

Business Man Beaten Case : आरोपी मनोज मिश्रा चेतन सिंग आणि विपुल सिंग या तीन आरोपींना वनराई पोलिसांनी अटक केली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Mumbai News : व्यावसायिक राजकुमार सिंग यांना अपहरण करून बंदुकीच्या धाकावर धमकावल्या प्रकरणी मुंबईच्या वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल तीन आरोपींना अटक केली होती. या तीनही आरोपींना आज न्यायालयात हजर केली असता त्यांना 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी मनोज मिश्रा चेतन सिंग आणि विपुल सिंग या तीन आरोपींना वनराई पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे अद्यापही फरार असून वनराई पोलीस राज सुर्वे सह इतर 6 ते 7 जणांचा शोध घेत आहेत.

या घटनेत वापरलेली बंदूक, प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज आणि बळजबरीने स्वाक्षरी केलेले स्टॅम्प पेपर जप्त करण्यात यावे, अशी मागणी आज आम्ही न्यायालयाकडे केली आहे. (Latest marathi News)

एवढेच नाही तर बिहारमधील या तिघांना मुंबईत कोणी रूम बुक केले, प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याच्याशी त्यांची ओळख कोणी करून दिली, मुंबईत या तीन आरोपींना कोणी मदत केली, या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. (Political News)

या प्रकरणी सध्या मुंबईतील वनराई पोलिसांनी मनोज मिश्रा, पद्माकर, राज सुर्वे आणि विकी शेट्टी यांच्यासह १० ते १२ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. त्यापैकी मनोज मिश्रा, विपुल सिंग, चेतन सिंग यांना काल विमानतळावरून अटक करून आज बोरिवली न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood Stories: 86 व्या वर्षीही काम करण्याची वेळ; हॉस्पिटलचा खर्चासाठी भागवण्यासाठी अभिनेत्याची धडपड

हरभजन सिंह यांच्यासह ७ खासदार भाजपात जाणार, वाचा लिस्ट

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

SCROLL FOR NEXT