मुंबई/पुणे

Kalyan News : बिल्डिंग 3 मजल्याची अन् नोटीस चौथ्या पाचव्या मजल्याला नोटीस, मालकही चक्रावले; KDMCचा अजब कारभार

Kalyan News : महापालिकेची नोटिस प्राप्त होताच शेख कुटुंबियांना धक्काच बसला.

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

Kalyan News: अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे कायमच चर्चेत असणारी कल्याण डोंबिवली महापालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्या जागेवर झालेल्या अनधिकृत बांधकामाची तक्रार करणाऱ्या इसमालाच तुमच्या इमारतीचा चौथा आणि पाचवा मजला अनधिकृत असल्याची नोटीस पाठवून कागदपत्रांची मागणी केली.

या नोटीसमुळे इमारत मालक देखील चक्रावून गेला असून इमारत तीन माळ्याची असताना चौथ्या पाचव्या माळ्याची कागदपत्र आणायचे कुठून असा सवाल आता इमारत मालकाने उपस्थित केला आहे. (Latest News Update)

कल्याण पश्चिमेतील जोशी बाग परिसरात शेख नावाची इमारत आहे. ही इमारत तीन मजली आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावर एक रुम विकण्यात आला आहे. या रुम मालकाने इमारतीच्या मालकाला विश्वासात न घेता इमारतीच्या जागेत एक शौचालय बांधले आहे. या बेकायदा शौचालायची तक्रार शेख कुटंबियांनी महापालिकेला केली आहे.

या तक्रारीनंतर शेख या इमारतीच्या विरोधात देखील तक्रार करण्यात आली. केडीएमसीच्या क प्रभागातील अधिकाऱ्यानी बेकायदा शौचालयाच्या विरोधात कारवाई केली नाही. दुसरीकडे शेख इमारतच धोकादायक असल्याचे सांगत इमारतीचा चौथा आणि पाचवा मजला अनधिकृत असल्याची नोटिस पाठवून या संदर्भात अहवाल सादर करा असे सांगितले गेले. (Kalyan News)

महापालिकेची नोटिस प्राप्त होताच शेख कुटुंबियांना धक्काच बसला. शेख इमारत ही केवळ तीन मजली आहे. चौथा आणि पाचवा मजला अस्तित्वात नाही. केडीएमसीच्या या भोंगळ कारभाराविषयी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या प्रकरणी आश्चर्य व्यक्त करत काही बोलण्यास नकार दिला. दरम्यान अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे कल्याण डोंबिवली महानगर पालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : सुवर्ण बाजारात अचानक खळबळ! सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले; १० दिवसांत अशा बदलल्या किमती

Pregnancy diet: गर्भवती महिलांसाठी श्रावणातील आहार ठरतोय महत्त्वाचा; मांसाहार टाळताना प्रोटीनची कमतरता होऊ नये म्हणून काय खावं?

Maharashtra News Live Update : रस्त्यावर खडी टाकण्याच्या कारणावरून सांगोल्यात दांडक्याने मारहाण

Shocking : नागपूर हादरले! १६ वर्षीय मुलीला धमकावले, ओलीस ठेवून वारंवार लैंगिक अत्याचार; १९ वर्षीय तरुणाला अटक

Maharashtra government : तुकाराम मुंढेंनी मांडला संपूर्ण प्लॅन अन् शिंदेंनी क्षणात दिला आदेश! FDA च्या बैठकीतील 'तो' मोठा निर्णय आला समोर

SCROLL FOR NEXT