विधानसभा निवडणूका तोंडावर असताना उद्धव ठाकरे यांनी एक मोठी घोषणा केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात सत्ता आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर उभारणार असल्याचं म्हटलंय. दरम्यान ठाकरेंच्या या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा मुंब्रामध्ये मंदिर उभारा असं म्हटलंय. यावर आता संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावलाय.
संजय राऊत म्हणाले, "गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे एक विषय मांडत असून यामुळे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पोटात कालवाकालव सुरु आहे. उद्धव ठाकरेंच्या म्हणण्याप्रमाणे, आमचं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभं करू. हा विषय फार महत्त्वाचं आहे. सिंधूदुर्गाच्या समुद्रकिनारी भ्रष्टाचारामुळे कोसळून पडला. छत्रपतींचा स्वाभिमान फडणवीस आणि शिंदेंनी दिल्लीच्या चरणी गहाण ठेवला. यामधून महाराष्ट्राला प्रेरणा मिळावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महाराजांचं मंदिर असावं, असं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात तेव्हा यांच्या पोटात दुखतं."
"काल फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेची चेष्ठा केली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी पु्न्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्यांनी याबाबत खिल्ली उडवली. उद्धव ठाकरेंच्या या कल्पनेनंतर फडणवीसांनी महाराजांचा पुतळा, पहिला मुंब्रामध्ये मंदिर उभारून दाखवा असं म्हटलं. तर मुंब्रा काय पाकिस्तानात उभारू. देवेंद्र फडणवीसांचे पूर्वज मुघलांची चाकरी करत होते आणि महाराष्ट्राशी गद्दारी करत होते," असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.s
संजय राऊत म्हणाले, शरद पवार हे संसदीय राजकारणातील भीष्म पितामह आहेत. त्यांच्यासारखी व्यक्ती राजकारणात असणं हे एका मार्गदर्शक आणि दिपस्थंबाप्रमाणे आहे. मार्गदर्शनासाठी शरद पवार संसदीय राजकारणात असणं गरजेचं आहे. देश वाचवण्यासाठी शदर पवार यांच्या सेनापतींची गरज आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.