Pune Indrayani River Bridge Collapses  Saam Tv News
मुंबई/पुणे

VIDEO : ताई माझे जिजू अन् मुलगा नाही सापडत, तो खूप लहान आहे; डोळ्यात अश्रूंच्या धारा; तरुणीची सुप्रिया सुळेंकडे आर्त विनवणी

Pune Indrayani River Bridge Collapses : 'माझा जावई आणि नातू बुडाले आहेत. ते सापडत नाहीय.' त्यानंतर त्यांची मुलगी आल्यानंतर ती देखील ताईंकडे आर्त विनवणी करते की, 'माझे जिजू आणि त्यांचा मुलगा सापडत नाहीय, तो पाचवीला आहे, तो खूप लहान, तुम्ही त्यांना शोधून द्या.'

Prashant Patil

पुणे : मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली असून तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळला आहे. त्यामध्ये अनेक पर्यंटक इंद्रायणी नदीमध्ये बुडाले असून २० ते २५ जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामध्ये काही लहाण मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दुर्घटनास्थळी खासदार सुप्रिया सुळे दाखल झाल्या आहेत. त्या आल्यानंतर एका कुटुंबाने त्यांचा जावई आणि नातू शोधण्यासाठी आर्त विनवणी करताना पाहायला मिळालं. ते सुप्रिया सुळे यांना म्हणाल्या की, 'माझा जावई आणि नातू बुडाले आहेत. ते सापडत नाहीय.' त्यानंतर त्यांची मुलगी आल्यानंतर ती देखील ताईंकडे आर्त विनवणी करते की, 'माझे जिजू आणि त्यांचा मुलगा सापडत नाहीय, तो पाचवीला आहे, तो खूप लहान, तुम्ही त्यांना शोधून द्या.' त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे देखील डोळे पाणावले आहेत.

पुण्यातील मावळमध्ये कुंडमळ्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करतात. त्यातच या ठिकाणचा पूल कोसळला. ही घटना आज रविवारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलिस दाखल झाले आहेत. कुंडमळा नदी ओलांडण्यासाठी, या बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पूल आहे आणि नेमका तोच पूल कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT