Sharad Pawar on Ajit Pawar and NCP SAAM TV
मुंबई/पुणे

Breaking News: शरद पवार, अजितदादा आज एकाच मंचावर येणार? पिंपरी चिंडवडमध्ये नाट्यमय घडामोडी घडणार!

Sharad Pawar vs Ajit Pawar: राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे.

Satish Daud

Sharad Pawar-Ajit Pawar News

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडमध्ये नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाला दोन्ही नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे नाट्य संमेलनाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विशेष बाब म्हणजे, पुण्यात शुक्रवारी नाट्य संमेलनाचं उद्घाटन करण्यात आले होते. या उद्घाटनाचे आमंत्रण मला मिळाले नाही, असं अजित पवार यांनी शुक्रवारी माध्यमांना सांगितलं होतं. मात्र, आज पिंपरीतील उद्घाटन सोहळ्याला आपण हजर राहणार असल्याचं अजितदादांनी कळवलं आहे

दुसरीकडे शरद पवार देखील पुण्यातील नाट्य संमेलनाला ऐनवेळी अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात नाराजीनाट्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आज शरद पवार देखील पिंपरीतल्या नाट्य संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं आज शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर दिसण्याची शक्यता आहे..

दरम्यान, पुण्यात शुक्रवारी जे घडलं ते आज पिंपरी चिंचवडच्या नाट्य संमेलनात घडणार नाही, अशी अनेकांना अपेक्षा आहे. असं घडल्यास शरद पवार आणि अजित पवारांच्या हालचालींसह त्यांच्या मनोगतांकडे सर्वांचं लक्ष लागून असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावतील. साधारण ११ दरम्यान वाजेच्या दरम्यान हा उद्घाटन सोहळा सुरू होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli : राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था; नागरिकांचे अनोखे आंदोलन, खड्ड्यात धान पिकाची रोवणी

Maharashtra Rain Live News: कीर्तनात गोंधळामुळे संगमनेरचे आजी माजी आमदार आमने सामने

Vivek Agnihotri : मराठी जेवण म्हणजे गरीबांचं जेवण... विवेक अग्निहोत्री बरळले, पाहा VIDEO

Mumbai Rain: 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', अंधेरीत पाणी साचल्यावर मनसेचा इशारा

Mumbai Rain: मुंबईत उद्या शाळांना सुट्टी? पुढचे १२ तास महत्वाचे, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT