Akshay Shinde Encounter Saam Tv
मुंबई/पुणे

Badlapur Case: सोमवारपर्यंत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करा: हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Akshay Shinde Encounter High Court: या सुनावणीत सोमवारपर्यंत अक्षय शिंदेंच्या मृतदेहाचे दफन करा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच यासाठी राज्य सरकार जागा देणार असल्याचेही वकिलांकडून सांगण्यात आले आहे.

Gangappa Pujari

सचिन गाड, मुंबई|ता. २७ सप्टेंबर

Akshay Shinde Encounter Case: बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर करण्यात आला. अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यविधीला विरोध होत असून दफण करण्यासाठी जागा मिळत नसल्याची तक्रार त्याच्या पालकांनी केली आहे. या संदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये महत्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत सोमवारपर्यंत अक्षय शिंदेंच्या मृतदेहाचे दफन करा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच यासाठी राज्य सरकार जागा देणार असल्याचेही वकिलांकडून सांगण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याची पोलिसांच्या चकमकीत एन्काऊंटर झाला. अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यविधीला बदलापूरकरांचा मोठा विरोध पाहायला मिळाला होता. तसेच बदलापूरमध्ये त्याचा मृतदेह दफन करु देणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली होती. याविरोधात अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना उच्य न्यायालयात धाव घेतली होती.

अक्षयच्या मृतदेहाची अवहेलना होत असून त्याचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत उच्च न्यायालयाने सोमवारपर्यंत मृतदेह दफन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी राज्य सरकार जागा उपलब्ध करून देणार आहे. राज्य सरकारच्या वकिलांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात ग्वाही दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon 2026 Update: जूनमध्येही उष्णतेचा तडाखा कायम; महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस

Maharashtra News Live Update: अकोल्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

९० किमी वेग, धडकी भरवणारं वादळ धडकणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, कुठे कोसळणार धो-धो पाऊस?

T20 वर्ल्ड कप खेळणारा संघ निलंबित; IPL होताच ICCची मोठी कारवाई

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT