Kalyan Latest News: Saamtv
मुंबई/पुणे

Kalyan Breaking News: मोठी बातमी! कल्याण ग्रामीणमधील गावांचा नवी मुंबई पालिकेत समावेश; 'ती' १४ गावे कोणती? वाचा

Kalyan Latest News: कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील '14 गावांचा' नवी मुंबई पालिकेत समाविष्ट करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

विनय म्हात्रे| कल्याण, ता. ९ जुलै २०२४

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील '14 गावांचा' नवी मुंबई पालिकेत समाविष्ट करण्यात आला आहे. गाव विकास समिती आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून नवीमुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील '14 गावांचा' नवीमुंबई पालिकेत समाविष्ट करण्या यावा अशी मागणी केली जात होती. गाव विकास समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी याबाबतची मागणी लावून धरली होती.

अखेर मनसे आमदार राजू पाटील यांच्या मागणीला यश आले असून कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील '14 गावांचा' नवीमुंबई पालिकेत समावेश करण्यात आला आहे. नवीमुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

नवी मुंबई पालिकेच्या 4 अभियंत्यांना मूळ विभागाचे कामं संभाळून या १४ गावांचे अतिरिक्त कामकाज पाहायचे आहे. भंडार्ली, पिंपरी गाव, गोटेघर, बंबार्ली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळण, बाळे आणि दहिसर मोरी. दहिसर, निघू, मोकाशीपाडा, नावाळी, या गावांचा यामध्ये समावेश आहे. 14 गावांच्या मालमत्ता हस्तातरणाच्या कामाला 11 तारखेपासून होणार आहे. दरम्यान, याबाबतचे आदेश निघताच फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं 30000 रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील 18k- 22k आणि 24k चे दर

Mumbai Crime : मुंबई हादरली! १० वर्षाच्या मुलासमोर महिलेवर बलात्कार; गळ्यावर कोयता ठेवून तडीपार गुंडाचं भयंकर कृत्य

Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

Nandurbar : हृदयद्रावक! इकडे बहिणीचा जन्म आणि दुसरीकडे भावाचा मृत्यू; माऊलीच्या आक्रोशाने सातपुडा सुन्न

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT