MAHA TET Paper Leak 
मुंबई/पुणे

BREAKING: 'नीट'नंतर आता 'टीईटी'चाही पेपर फुटला; ठाण्यात पेपर लीक, उद्याची परीक्षा रद्द

MAHA TET Latest News : ठाण्यात टीईटी पेपर लीक झाल्याच्या आरोपानंतर २८ जून रोजी होणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) रद्द करण्यात आली आहे. लाखो उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, नवीन परीक्षेची तारीख आणि पुढील निर्णयाची प्रतीक्षा आहे.

Namdeo Kumbhar

MAHA TET paper leak latest news : देशभरात गाजलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाले आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) चा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्यात टीईटी परीक्षेचा पेपर लीक झाल्याचे उघडकीस आले आहे, त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून उद्या (२८ जून) होणारी ही परीक्षा तडकाफडकी रद्द करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; परीक्षा ऐनवेळी रद्द

राज्यभरातून लाखो उमेदवारांनी या परीक्षेसाठी जय्यत तयारी केली होती. परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कडक नियमावलीही जाहीर केली होती. मात्र, ऐन परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच ठाण्यातून पेपर लीक झाल्याची माहिती समोर आल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये आणि कार्यरत शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पुढील परीक्षा कधी?

राज्यभरातून लाखो उमेदवारांनी या परीक्षेसाठी जय्यत तयारी केली होती. परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कडक नियमावलीही जाहीर केली होती. मात्र, ऐन परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच ठाण्यातून पेपर लीक झाल्याची माहिती समोर आल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये आणि कार्यरत शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्यामुळे आता ही परीक्षा पुन्हा कधी घेतली जाणार? याकडे सर्व उमेदवारांचे आणि शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अद्याप नवीन तारीख जाहीर झालेली नाही. महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, परीक्षा पारदर्शक वातावरणात कधी होणार, असा संतप्त सवाल परीक्षार्थी विचारत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fresh Flowers : पूजेची फुले लगेच वाळतात? 'ही' १ सोपी ट्रिक वापरा, आठवडाभर राहतील ताजी तवानी

CJP Protest: खरी लढाई तर आता सुरू, सीजेपी नेते आंदोलनावर ठाम; थेट पंतप्रधानांवर केले गंभीर आरोप

Navratri Horoscope : नवरात्रीत ग्रहांची स्थिती बदलणार नशीब! कोणत्या राशींचे भाग्य उजळणार? कुंभ राशीपासून या राशींच्या व्यक्तींचे अडथळे होणार दूर

Maharashtra News Live Update: भाजपने आणीबाणीलाही मागे टाकले, आशुतोष रांकांचा गंभीर आरोप

Nana Patekar: नाना पाटेकरांना हार्ट अटॅक कशामुळे आला? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सत्य आलं समोर?

SCROLL FOR NEXT