Mohit Kamboj : 'मातोश्री' समोरून जाताना भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला; रेकी केल्याचा आरोप  
मुंबई/पुणे

Mohit Kamboj : 'मातोश्री' समोरून जाताना मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला; रेकी केल्याचा आरोप

उद्या हनुमान चालीसा पठण करण्याच्या राणा दाम्पत्यांच्या इशाऱ्यानंतर कंबोज यांच्याकडून मातोश्रीची रेकी करण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा राणा दाम्पत्याने दिल्यानंतर राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी केली आहे. दरम्यान, काहीच वेळापूर्वी भाजपनेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाड्यांचा ताफा मातोश्रीसमोरून जात असताना शिवसैनिकांकडून कंबोज यांच्या गाडीवर मातोश्रीजवळील कलानगर सिग्नलजवळ हा हल्ला करण्यात आला आहे. उद्या हनुमान चालीसा पठण करण्याच्या राणा दाम्पत्यांच्या इशाऱ्यानंतर कंबोज यांच्याकडून मातोश्रीची रेकी केल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर शिवसैनिक अधिकच आक्रमक झाले होते. सकाळपासूनच शिवसैनिक मातोश्री परिसरात जमले होते. संध्याकाळच्या सुमारास मोठ्या संख्येने शिवसैनिकांची गर्दी जमली. रात्री भाजप नेते मोहित कंबोज यांच्या वाहनांचा ताफा हा मातोश्री परिसरातून जात असतानाच, कलानगर सिग्नलजवळ जमावानं अडवण्यात आला. त्यानंतर जमावानं कंबोज यांच्या कारवर हल्ला केला. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप होत आहे. मोहित कंबोज हे रेकी करत असल्याचा आरोप होत आहे.

हल्ल्याच्या घटनेनंतर मोहित कंबोज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक लग्नाचा कार्यक्रम उरकून घरी जात होतो. कलानगरला सिग्नलजवळ माझी कार थांबली. त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कारवर हल्ला केला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही, असं ते म्हणाले. रेकी करत असल्याच्या आरोपावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मी रेकी करत नव्हतो. मी एका लग्नसोहळ्यानंतर घरी जात होतो. त्याचवेळी माझ्या कारवर हल्ला केला, असं कंबोज यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एल निनोमुळे खरिपानंतर रब्बी पिकांवरही संकट; देशात अन्नधान्याचा तुटवडा भासणार?

Healthy Lifestyle : सिगारेट-दारूपेक्षाही खतरनाक आहे 'ही' १ गोष्ट, मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

SCROLL FOR NEXT