Boyfriend went to school wearing burqa to meet girlfriend people beaten case filed police in pune Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: प्रेयसीला भेटायला बुरखा घालून शाळेत गेला; मुलं चोरणारा समजून लोकांनी बदडला, पुण्यातील घटना

Pune Crime News: अल्पवयीन प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर तिच्या शाळेत बुरखा घालून गेला. परंतु त्याचा हा जुगाड कामी आला नाही. परिसरातील नागरिकांनी त्याला पकडले.

Satish Daud

Pune Men Wearing Burkha

प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं नेहमी म्हणतात. प्रेमात असलेले प्रियकर आणि प्रेयसी कोणत्याही अडचणींना सामोरं जाण्यासाठी तयार असतात. एकमेकांना भेटण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत असतात. कधी-कधी त्यांचा हा जुगाड चालून जातो, मात्र कुणी पकडल्यानंतर त्यांची तारांबळ होते. असाच काहीसा प्रकार पुणे शहरात घडला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अल्पवयीन प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर तिच्या शाळेत बुरखा घालून गेला. परंतु त्याचा हा जुगाड कामी आला नाही. परिसरातील नागरिकांनी त्याला पकडले. बघता-बघता लहान मुले पळवणारी टोळी आली अशी अफवा परिसरात पसरली. काहींनी या तरुणावर हात साफ करुन घेतला. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

यामुळे तरुणाची मोठी फजिती झाली. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात असलेल्या इंदिरानगरमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. विजय अमृत वाघारी असं अटक करण्यात आलेल्या प्रियकराचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विजयचे आदर्श इंदिरानगर परिसरातील शाळेमध्ये इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. दोघेही एकमेकांना भेटून फिरण्यासाठी जात होते. काही दिवसांनी दोघांच्या प्रेमाची कुणकुण त्यांच्या कुटुंबियांना लागली.

कुटुंबियांनी दोघांनाही समज देऊन एकमेकांना भेटण्यासाठी मज्जाव केला. प्रेयसीला भेटता येत नसल्याने विजय वेडापिसा झाला होता. म्हणून त्याने बुरखा घालून तिच्या शाळेत जाण्याचा प्लान आखला. मात्र, त्याचा हा प्लान फसला. मुलं चोरणाऱ्या टोळीचा मेंबर समजून परिसरातील नागरिकांनी त्याला चोपून काढलं. तसेच पोलिसांच्या ताब्यात दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT