Pune boyfriend kills girlfriend on birthday in lodge 
मुंबई/पुणे

रक्तरंजित बर्थडे! गर्लफ्रेंडला लॉजवर नेलं; आधी जंगी सेलीब्रेशन केलं, नंतर ब्लेडनं वार केले, ६ वर्षांच्या प्रेमाचा भयानक अंत

Pune boyfriend kills girlfriend on birthday in lodge : पिंपरी चिंचवडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने प्रेयसीचा वाढदिवस लॉजमध्ये साजरा केल्यानंतर ब्लेडने वार करून हत्या केली. सहा वर्षांच्या प्रेमाचा असा भयानक शेवट झाला आहे.

Namdeo Kumbhar

गोपाळ मोटघरे, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

Boyfriend Kills Girlfriend in Pune Lodge After Celebration : संशयाचे भूत डोक्यात शिरले की माणूस कोणत्या स्तराला जाऊ शकतो, हे सांगता येत नाही. पिपंरी चिचंवडमध्ये संशयामुळे सहा वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट झाला. धक्कादायक म्हणजे, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडचा बर्थडेच्या दिवशीच जीव घेतला. लॉजवर दोघांनी बर्थडेचे जंगी सेलीब्रेशन केले. त्यानंतर त्याने ब्लेडने सपासप वार करत जीव घेतला. इन्टाग्रामवरून दोघांची ओळख झाली होती, त्यातून प्रेम फुललं. पण गेल्या काही दिवसांपासून गर्लफ्रेंड दुसऱ्याच्या प्रेमात असल्याचा संशय तरूणाच्या मनात आला अन् भयानक पाऊल उचलले.

पिंपरी चिंचवड शहरात प्रियकराने प्रेयसीची लॉजमध्ये ब्लेडने वार करून हत्या केली आहे. प्रियकराने लॉजमध्ये प्रेयसीचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर चाकू आणि ब्लेडने वार करत निर्घृण हत्या केली. वाकड येथील लॉजवर शनिवारच्या दुपारी ही घटना घडली. प्रेयसी दुसऱ्याच व्यक्तीच्या प्रेमात पडली, असा संशय प्रियकराला होता. त्या संशयातून त्याने हे भयानक कृत्य केले.

गर्लफ्रेंडची हत्या केल्यानंतर प्रियकर हा पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. मेरी तेलगू असं प्रेयसीचं नाव आहे तर दिलावर सिंग आरोपीचे नाव आहे. डी-मार्टमध्ये काम करणारी मेरी आणि हॉटेल व्यावसायिक दिलावर सहा वर्षांपासून प्रेमात होते. इन्स्टाग्रामवरुन त्यांची मैत्री झाली, पुढं एकमेकांवर प्रेम जडलं. आयुष्यभर सोबत राहण्याच्या शपथा घेणाऱ्या प्रेमाचा संशयातून शेवट झाला. या घटनेनंतर पिंपरी चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी फोन करून सांगितले की, एक इसम हा पोलीस स्टेशनला आला, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, त्याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते परंतु ती त्याचा विश्वासघात करून दुसऱ्या सोबत संबंध ठेवत आहे असा त्याला संशय आहे. त्यामुळे तिला आज वाकड पोलीस स्टेशन हद्दीत काळाखडक येथील लाजवर दुपारी नेले. तिचा मोबाईल चेक केला असता दुसरे माणसासोबत नग्न फोटो दिसल्याने राग आला. सोबत आणलेल्या चाकू व लोखंडी पानाने ठार मारले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई - सोलापूर विमानसेवेचे पहिले प्रवासी म्हणून मुख्यमंत्री फडणवीस येणार सोलापूरला

Stomach Cancer: 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, असू शकतं पोटाचा कॅन्सर

फक्त ४१६ रूपयांत व्हाल करोडपती; पोस्टाची भन्नाट योजना कोणती? जाणून घ्या सविस्तर

Sudden Weight Loss: अचानक वजन कमी होतंय? असू शकतो 'या' गंभीर आजाराचा धोका

Dombivli Crime : डोंबिवलीत मोठा राडा! पगाराच्या मुद्द्यावरून चाकू हल्ला, रिक्षा युनियन लीडरवर सपासप वार

SCROLL FOR NEXT