Pune Loni kalbhor Police Station Saamtv
मुंबई/पुणे

Pune Crime News : प्रेम जुळलं अन् गावातून पळूनही गेले; मात्र प्रेयसीने अचानक जीवन संपवलं, प्रियकराविरोधात गुन्हा दाखल

Pune Latest Crime News : प्रियकराविरुद्ध लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Pune News :

प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने फसवल्यामुळे झालेल्या मानसिक त्रासानंतर प्रेयसीने आत्महत्तेसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. याप्रकरणी प्रियकराविरुद्ध लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

आदित्य आणि प्रतीक्षा दोघेही एकाच गावात राहत होते. दोघांचे तिथेच प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर आदित्यने विवाहाचे आमिष दाखवून प्रतीक्षाला घेऊन गावातून पळवून नेले. त्यानंतर प्रतीक्षाने त्याच्याकडे विवाह करण्याबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने लग्नास नकार दिला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आदित्यने अचानक लग्नास नकार देत तुला जे करायचे ते कर,असे म्हटलं. मात्र आदित्यच्या या निर्णयाचा प्रतीक्षाला खूप त्रास झाला. या मानसिक त्रासातूनच प्रतीक्षाने टोकाचा निर्णय घेतला. प्रतीक्षा हिने हडपसर-सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात राहणाऱ्या मामाच्या घरी गळफास घेऊन जीवनं संपवलं. (Pune Latest News)

घटनेनंतर प्रेयसीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रियकर आदित्यविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दहावीच्या पेपर तपासणीचा मोठा घोटाळा; कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार? VIDEO

Maharashtra Live News Update: निलंगा बस डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे रमाई आवास योजनेत घोटाळा; फडणवीसांच्या नावाचं बनवलं चक्क आधार आणि रेशनकार्ड

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

LPG Crisis : 'गॅस' भडका शमवण्यासाठी ओतणार 'रॉकेल'; टंचाईवर काढला तोडगा, सरकारनं घेतले २ महत्वाचे निर्णय

SCROLL FOR NEXT