Boyfriend-Girlfriend Matter Saam Tv
मुंबई/पुणे

बापरे! व्हाट्सअॅप चॅटिंग तपासल्यानंतर प्रियकराची सटकली, गर्लफ्रेंडसोबत केलं भयंकर कृत्य

प्रेमावरील विश्वासाला तडा गेला की, प्रेमीयुगुल होत्यांच नव्हतं करून टाकतात.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : प्रेमीयुगुल एकमेकांच्या प्रेमात आकंठ बूडतात. पण त्यांचा प्रेमावरील (love-Affaire) विश्वासाला तडा गेला की, होत्यांच नव्हतं करून टाकतात. पुण्यातही प्रियकर आणि प्रयेसीची अशीच एक भयंकर घटना घडली आहे. प्रियकराने प्रेयसीचा मोबाईलवर व्हाट्स अॅप चॅटिंग तपासत (What's App Chatting) असताना एका व्यक्तीसोबत तिने केललं चॅटिंग पाहिलं. त्यानंतर प्रियकराने रागाच्या भरात प्रेयसीची धुलाई केली. प्रियकराने मारहाण केल्यानंतर संतापलेल्या प्रेयसीने थेट पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर प्रेयसीने प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी (Police Case Filed) आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं ?

प्रियकर आणि प्रेयसीमध्ये सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मार्केटयार्ड परिसरातील एका सार्वजनिक रस्त्यावर भांडण झालं. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दरम्यान, सोमवारी फिर्यादी तरुणी प्रियकराला भेटण्यासाठी मार्केटयार्ड परिसरात गेली होती. त्यावेळी या प्रेमीयुगुलात गप्पा रंगल्या. त्यावेळी प्रियकराने प्रेयसीचा मोबाईल घेतला आणि व्हाट्सअप चॅटिंग तपासू लागला.

त्यानंतर प्रियकराने प्रेयसीनं बहिणीसोबत केलेलं चॅटिंग पाहिलं. परंतु त्याला याबाबत सत्य वाटलं नाही. प्रेयसीने दुसऱ्या व्यक्तीसोबत चॅटिंग केले असावे, असा संशय प्रियकराला आला. त्यानंतर त्याने प्रेयसीला भर रस्त्यात मारहाण करत शिवीगाळ केली.भर रस्त्यात प्रियकराने मारहाण केल्यानंतर प्रेयसी देखील संतापली. तिने पोलिस स्टेशन गाठले आणि प्रियकराविरोधात तक्रार दिली.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तिसरी माळ; तुळजापुरात भाविकांची मांदियाळी

Mint-Lemon Juice For Liver Health: लिव्हरच्या आरोग्यासाठी बेस्ट ड्रिंक, आठवड्यातून 2 वेळा प्यायल्यास होईल फायदा

Shardiya Navratri 2026 : यंदाच्या नवरात्रीत अष्टमी-नवमी कधी आहे? तिथीमुळे कन्फ्यूजन वाढलंय? जाणून घ्या शुभ मुहूर्त

भाजप आमदारालाच गंडा घालण्याचा प्रयत्न! SBI मध्ये नोकरीचं आमिष, नेमकं प्रकरण काय?

कोकणात उष्णतेची लाट! रत्नागिरीत 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा, १४३ वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद

SCROLL FOR NEXT