Mumbai News  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News : मोबाईलवर गेम खेळणं जीवावर बेतलं? अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टरच्या‌ मुलाचा 22 व्या मजल्यावरून पडून मृत्यू

Boy Dies After fallen from building : अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर अगरवाल यांचा हा मुलगा आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Mumbai News : मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील मरोळ भागामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मरोळ भागातील एका उंच इमारतीच्या 22 व्या मजल्यावरून पडून एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

वसंत ओएसिस असं या इमारतीचे नाव असून अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर अगरवाल यांचा हा मुलगा आहे. तो नुकताच आपल्या आईबरोबर मुंबईत सुट्टी घालवण्यासाठी आला होता. मात्र परवा संध्याकाळी इमारतीच्या 22 व्या मजल्यावरुन पडून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होऊन मुलाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी पालिकेच्या विलेपार्ले येथील कृपा रुग्णालयात पाठवला. सुरुवातीला एमआयडीसी पोलिसांनी वेगळ्या अँगलने या घटनेचा तपास केला.  (Latest Marathi News)

मोबाईलवर गेम खेळताना घडली घटना

मात्र प्राथमिक माहितीनुसार तो मुलगा डिप्रेशनमध्ये होता. मोबाईलवर गेम खेळत असताना खाली पडून त्याचा मृत्यू झाला असल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एडीआर दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोकणच्या विधान परिषद निवडणुकीत सुनील तटकरेच धुरंधर ठरण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana : सर्वात मोठी अपडेट! तब्बल ८० लाख लाडकीचा लाभ बंद, योजनेसाठी अर्जाची पुन्हा नोंदणी सुरू होणार का?

FYJC Admission 2026: अकरावी प्रवेशासाठी मोठा निर्णय! गुणपत्रक अन् शाळा सोडल्याचा दाखला नसतानाही मिळणार प्रवेश

Mumbai Rain Alert : मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, 'या' शहरांना यलो अलर्ट जारी; वाचा हवामानाचा अंदाज

Famous Actress : एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री आता रस्त्यावर मागतेय भीक, फोटो पाहून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT