Borivali Teen Girl Sends Live-In Agreement Photo to Parents; Alleged Love Jihad Sparks Controversy Saam Tv
मुंबई/पुणे

अॅग्रीमेंट रिलेशनशीप, लव्ह जिहादचा नवा ट्रेंड? मुलींना फसवण्यासाठी नवं जाळं?

Love Jihad’s New Tactic: आता बातमी आहे लव्ह जिहादच्या नव्या ट्रेंडची... मात्र हिंदू मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढण्यासाठी कोणता ट्रेंड वापरत असल्याचा आरोप कऱण्यात आलाय? आणि बोरीवलीत घडलेली घटना नेमकी काय आहे?

Bharat Mohalkar

ठिकाण- बोरीवली

21 वर्षीय तरुणीनं कुटुंबाच्या विरोधात जाऊन मुस्लीम तरुणासोबत रिलेशनशीप अॅग्रीमेंट केलं आणि... त्यामुळे कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली..मुलगी कॉलेजला जात होती.. तिथंच शाहीद शेख नावाच्या तरुणाने आपल्या मुलीला लव्ह जिहादसाठी प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप तरुणीच्या आईने केलाय..

खरंतर 21 वर्षीय तरुणी याआधीच घरातून पळून गेली होती... ती तिच्या प्रियकरासोबत राहत होती.. मात्र कुटुंबियांनी तिची समजूत घातल्यानंतर ती पुन्हा घरी आली.. मात्र आता ती तरुणी घरातून पुन्हा पळून गेली आणि तिने कुटुंबियांच्या मोबाईलवर लिव्ह इन अॅग्रीमेंटचा फोटो पाठवला आणि तिचे पालक हादरुन गेले.. आता या प्रकरणात भाजपचे आमदार संजय उपाध्याय यांनी उडी घेतलीय.. तर ते अॅग्रीमेंटच बेकायदेशीर असल्याचा दावा केलाय..

खरंतर लव्ह जिहाद म्हणजे नाव आणि धर्म लपवून हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढणं.... तिचं धर्मांतरण आणि शोषण करणं.... अशाच प्रकारातून वसईच्या श्रद्धा वालकरची हत्या झाल्याचा दावा करण्यात आला.. त्यानंतर सरकारने लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करण्याच्या हालचाली सुरु केल्या.. आता या लव्ह जिहाद प्रकरणात लिव्ह इन अॅग्रीमेंटचा नवा ट्रेंड आलाय.. त्यामुळे सरकार फसवणूक करुन धर्मांतरासाठी सुरु असलेला लव्ह जिहाद रोखण्यासाठी कठोर कायदा करणार का? आणि याबरोबरच तरुणी सज्ञान असल्यानं ती स्वतःच्या मर्जीने गेलीय की दबावाखाली? याचीही चौकशी करण्याची गरज आहे... मात्र हे प्रकरण लव्ह जिहादचं असेल तर पोलीसांनी कठोर कारवाई करायला हवी...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : ठाकरे गटाच्या आमदाराच्या जवळच्या सहकाऱ्याचा धिंगाणा, कारमधून फोडले २८८ फटाके, VIDEO

Shocking : आशियाई खेळात भारताचं नेतृत्व करणाऱ्या खेळाडूने आयुष्य संपवलं, क्रीडा विश्वात खळबळ

भारताविरोधात चीन्यांची नवा डाव? पेंगाँग जवळ चीनचा हवाई तळ?

Shocking : कॉलेजला जाताना अडवलं; भररस्त्यात तरुणीवर तरुणाकडून अॅसिड हल्ला, राजधानीत खळबळ

Vitamins: जास्त व्हिटॅमिन्सही बरं नव्हं! अति सेवनाने आरोग्यावर होतो दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT