ST Bus Saam Tv
मुंबई/पुणे

Diwali Bonus : एसटी कामगारांना मिळणार बोनस, राज्य शासनाकडून ४५ कोटी रुपये महामंडळाला वर्ग

कर्मचाऱ्यांना अडीच हजार तर अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये बोनस म्हणून मिळणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारनं दिवाळीआधी एसटी कर्मचाऱ्यांना (ST Employee) मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्य सरकारनं 89 हजार एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देत दिवाळी भेट म्हणून 45 कोटी रुपये महामंडळाला वर्ग केले आहेत. एसटीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून हा निधी दिला जाईल. कर्मचाऱ्यांना अडीच हजार तर अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये बोनस म्हणून मिळणार आहेत.

आर्थिक तोट्यात असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी बोनस ही अनपेक्षित भेट आहे. एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन देणे देखील महामंडळाला राज्य सरकारशिवाय शक्य नाही. कारण याच महिन्यात दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं होतं. (Latest Marathi News)

एसटीच्या कर्मचारी, अधिकारी यांचं सप्टेंबर महिन्यातील वेतन रखडलं होतं. महामंडळाच्या अंतर्गत निधीतून हे वेतन अदा करण्यात आलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी 360 रुपये लागतात. एसटीची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने जवळपास 2 हजार कोटी रुपयांची देणी बाकी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT