Bombay High Court News  AI Image
मुंबई/पुणे

High Court : पत्नीला वेळ देता येत नसेल तर ती क्रूरता नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय!

Bombay High Court News : पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी पतीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. पती-पत्नीमधील वादात बोललेल्या एका वाक्यावरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Alisha Khedekar

पती-पत्नीमध्ये होणाऱ्या वादातून बोललेले एखादे वाक्य म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे असे म्हणता येणार नाही, असे महत्त्वाचे निरीक्षण हाय कोर्टाने नोंदवले आहे. पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेल्या पतीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित जोडप्याचं लग्न २०२५ मध्ये झाला होता. दोघांमध्ये काही कारणांवरून वारंवार वाद होत असल्याचे समोर आले. एके दिवशी पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. यावेळी पत्नीने पतीला, 'तू माझे ऐकले नाहीस तर मी माझे आयुष्य संपवेन', अशी धमकी दिली होती. त्यावर पतीने 'तुला काय करायचे ते कर' असे उत्तर दिले. त्यानंतर तो घराबाहेर निघून गेला. काही वेळानंतर पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणानंतर पतीविरोधात पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात पतीने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने पती-पत्नीमधील वाद आणि उपलब्ध परिस्थितीचा विचार केला. पती नोकरीच्या कामामुळे पत्नीला पुरेसा वेळ देऊ शकत नसेल किंवा तिला बाहेर फिरायला घेऊन जात नसेल, तर केवळ या कारणांमुळे त्याला क्रूर वागणूक दिल्याचा दोष देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

तसेच, भांडणाच्या वेळी पतीने बोललेल्या एका वाक्यावरून त्याने पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असेही न्यायालयाने नमूद केले. या निरीक्षणांच्या आधारे उच्च न्यायालयाने आरोपी पतीला जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे वैवाहिक वाद आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपांबाबत न्यायालयाने महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Foot Care : पायाच्या तळव्यावर झालीये कडक गाठ? चालतानाही होतोय असह्य त्रास? काय आहे 'हा' गंभीर आजार

Maharashtra News Live Update: सरकारी इमारती आणि मंत्र्यांच्या बंगल्यांचे होणार फायर ऑडिट; वनमंत्री गणेश नाईकांची मुख्य सचिवांकडे मागणी

Cardiac arrest: ऑफिस, जिम किंवा घरात कुणाला हार्ट अटॅक आला तर काय कराल? जीव वाचवण्यासाठी तातडीने करा 'ही' मदत

Power Nap : पॉवर नॅप किती मिनिटांची असावी? १०, २० की ३० मिनिटं; जाणून घ्या योग्य वेळ

किचनमध्ये चाकू कोणत्या दिशेला ठेवावा? वास्तुशास्त्र काय सांगते?

SCROLL FOR NEXT