Bomb Threat  Saam Tv
मुंबई/पुणे

Bomb Threat In Mumbai: मुंबई पालिका मुख्यालयासह, महाविद्यालये अन् विमानतळाला बॉम्बने उडवून देऊ, अज्ञात व्यक्तीकडून पुन्हा धमकी; पोलीस यंत्रणा अलर्टवर

Bomb Threat To 50 Hospitals Colleges BMC Headquarters: मुंबईत आता रूग्णालयानंतर पालिका मुख्यालय, कॉलेज आणि विमानतळावर बॉम्ब असल्याची धमकी मिळाली आहे. पोलीस धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

Rohini Gudaghe

सचिन गाड, साम टीव्ही मुंबई

मुंबईतील जवळपास ५० हॉस्पिटलमध्ये बॉम्ब असलेल्या धमकीचा मेल आला होता. त्यानंतर आता पालिका मुख्यालय, कॉलेज आणि विमानतळावर देखील बॉम्ब असल्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस सतर्क मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील जवळपास ५० मोठ्या रुग्णालयांमध्ये धमकीचे ईमेल आलेत.

मेल करून बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. सलग आलेल्या धमक्यांमुळे मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. तर मुंबईकरांमध्ये काही प्रमाणात दहशतीचं वातावरण दिसत (Bomb Threat In Mumbai) आहे. आत्तापर्यंत काहीही संशयास्पद आढळल नसल्याची स्पष्टोक्ती मुंबई पोलिसांनी दिली आहे. धमकीचे मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुंबई पोलिसांना प्राथमिक तपासानंतर मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील ५० नामांकित रुग्णालयांना त्यांच्या ईमेल आयडीवर धमकीचा मेल (Mumbai News) प्राप्त झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. धमकी मिळालेल्या ठिकाणी अजून काही संशयास्पद सापडलेले (Mumbai Crime News) नाही. असा मेल पाठवण्यामागे नेमका काय हेतु आहे, याचा देखील पोलीस शोध घेत आहे.

पुण्यातही धमकीचा मेल

पुण्यात देखील सह्याद्री हॉस्पिटलसह ६० ते ७० रुग्णालयांमध्ये बॉम्ब ठेवला असल्याच्या धमकीचा मेल मिळाला होता. त्यामुळे पुणे शहरात चांगलीच खळबळ उडाली होती. धमकी मिळाल्यानंतर पुणे पोलीस अॅक्टीव्ह झाले (Bomb Threat) होते. त्यांनी तातडीने डेक्कन परिसरात धाव घेऊन घटनास्थळी तपासणी केली होती. यावेळी बॉम्बशोधक पथकाने देखील शोध घेतला. परंतु त्यांना तपासणीत कोणतीही बॉम्बसदृश्य वस्तू आढळली नव्हती. आता मुंबईत पालिका मुख्यालय, कॉलेज आणि विमानतळांना देखील बॉम्बची धमकी मिळाली आहे, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

Anushka Sharma : RCB च्या विजयानंतर अनुष्काची खास पोस्ट; विराटसोबत बेभान होऊन नाचली, मिसेस कोहलींचा आनंद गगनात मावेना | VIDEO

MLC Election : पुण्यात मोठा ट्वीस्ट! भाजप नेत्याला राष्ट्रवादीतून उमेदवारी, ३ तास आधी हातात घड्याळ घेतलं अन्...

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

Political News : पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळात मोठा विस्तार, ३५ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

SCROLL FOR NEXT