Bomb Threat In Mumbai School Saam Tv
मुंबई/पुणे

Bomb Threat In Mumbai : मुंबईतील शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी, अफझल गँगकडून धमकीचा ईमेल

Mumbai School Bomb Threat : मुंबईच्या ओशिवरा रायन इंटरनॅशनल ग्लोबल स्कूलला ईमेलद्वारे शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. ही माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे बॉम्बशोधक पथक शाळेत पोहोचले. सध्या शाळेत तपास सुरु आहे.

Yash Shirke

Bomb Threat In Mumbai : मुंबईतील अंधेरी परिसरातून धक्कादायक प्रकार घडला आहे. अंधेरी पश्चिममधील एका शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांसह बॉम्ब स्क्वाड शाळेत पोहोचले आहेत. बॉम्ब ठेवल्याच्या बातमीमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या ओशिवरा रायन इंटरनॅशनल ग्लोबल स्कूल या शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. हे कृत्य अफझल टोळीकडून करण्यात आल्याची माहिती शाळेने दिली आहे. शाळेच्या ई-मेलवर धमकी संबंधित मेल आल्याचे शाळेच्या प्रतिनिधींनी सांगितले.

बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांचे बॉम्बशोधक पथक आणि डॉग स्क्वॉड रायन इंटरनॅशनल ग्लोबल स्कूलमध्ये पोहोचले. शाळेच्या आत बॉम्ब शोधण्याचे काम सुरु आहे. शाळेत बॉम्ब आहे की नाही हे संपूर्ण तपास झाल्यानंतर कळेल असे बॉम्बशोधक पथकाने सांगितले आहे.

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. बॉम्बशोधक पथक आणि डॉग स्क्वॉड शाळा आणि परिसरात बॉम्बचा शोध घेत आहे. दरम्यान या घटनेमुळे आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aloe Vera Juice: घरी कोरफडचा रस कसा बनवायचा? सोपी आहे पद्धत

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! आज वाहतुकीत मोठे बदल, 'हे' आहेत पर्यायी मार्ग

Maharashtra Live News Update : पुणेकरांवरील 5 टक्क्यांवरील करवाढ रद्द

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या रखडलेल्या हप्त्याबाबत सरकारच्या हालचाली;₹१५००बाबत मोठी अपडेट समोर

Social Media Ban: अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर बंदी? केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय?

SCROLL FOR NEXT