kurla women killed case Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचा उलगडा; २४ तासांत चक्रावून टाकणारी माहिती

Mumbai Crime News: मुंबईतल्या कुर्ला भागात एका बंद सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

Satish Daud

Kurla Bag Humen Body Found

मुंबईतल्या कुर्ला भागात एका बंद सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली होती. हत्या झालेल्या महिलेची ओळख पटवणे तसेच आरोपीला शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत २४ तासांत या हत्याकांडाचा छडा लावला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चारित्र्याच्या संशयावरून महिलेची हत्या झाली, अशी प्राथामिक माहिती आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष ५ ने मृत महिलेच्या प्रियकराला ताब्यात घेतलं आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला आणि संशयित आरोपी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

महिलेच्या चारित्र्यावर तिच्या प्रियकराला संशय होता. यावरून दोघांमध्ये अचानक वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपीने मृत महिलेची हत्या केली. त्यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरून कुर्ला येथे मेट्रोचं काम सुरू असलेल्या साईटवर फेकून दिला.

महिलेची ओळख पटवू नये म्हणून आरोपीने तिचा चेहराही विद्रुप करण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही, तर त्याने महिलेसोबत राहत असलेले सर्व पुरावे देखील नष्ट केले. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेका रद्द, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT