mumbai high court,  saam tv
मुंबई/पुणे

पिंपरी- चिंचवड महापालिका नर्स भरती प्रक्रियेस न्यायालयाची स्थगिती : यशवंत भाेसले

गरज सराे वैद्य मरो अशी भूमिका पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतली हाेती अशी टीका यशवंत भाेसले यांनी केली.

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad) महापालिकेच्या नर्स (nurse) भरती प्रक्रियेस मुंबई उच्च न्यायालयाने (mumbai high court) स्थगिती दिल्याची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून मानधन पद्धतीने काम करणाऱ्या बहुसंख्य नर्स आहेत. त्यांना कायम स्वरुपी भरती प्रक्रियेत डावल्याने मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका नर्स भरती प्रक्रियेला तातडीनं स्थगिती दिल्याचा दावा भाेसले यांनी माध्यमांशी बाेलताना केला आहे. (pimpri chinchwad latest marathi news)

पिंपरी चिंचवड महापालिकेतील वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये गेल्या पंधरा- सोळा वर्षापासून शेकडो नर्स मानधन पद्धतीने कार्यरत आहेत. जिवघेण्या कोरोना (corona) साथीत देखील मानधन नर्स यांच्याकडून महापालिकेने अहोरात्र काम करून घेतले. मात्र महापालिकेतील कायम स्वरुपी भरती प्रक्रिया करत असताना या कंत्राटी नर्संना डावलण्यात आले.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील वेगवेगळ्या रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या 493 नर्सना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी महापालिकेने ठराव मंजूर केला आहे. हा ठराव शासन दरबारी मान्यतेसाठी प्रलंबित असताना देखील महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी स्वतःच्या आर्थिक हितासाठी आरोग्य विभगात 131 पदांसाठी कायम स्वरुपी भरती प्रक्रिया सुरू केली होती.

त्या विरोधात राष्ट्रीय श्रमिक आघाडीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने पिंपरी चिंचवड महापालिकेतील नर्स भरतीला स्थगिती दिली आहे अशी माहिती आघाडीचे अध्यक्ष कामगार नेते यशवंत भाेसले (yashwant bhosale) यांनी दिली.

गरज सराे वैद्य मरो अशी भूमिका पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतली. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने तातडीने स्थगिती दिल्याचे कामगार नेते यशवंत भोसले म्हणाले. यावेळी मीनाक्षी वाघमोडे, सारिका मांदळे, योगिता चांदणे यांच्यासह अन्य नर्स उपस्थित हाेत्या.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT