Sharad Pawar-led NCP faction announces its first list of candidates for the BMC elections in Mumbai. saam tv
मुंबई/पुणे

BMC Election: मुंबई महापालिकेसाठी शरद पवार गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर; पहिल्या यादीत फक्त ७ नावे

Sharad Pawar NCP First Candidates List: शरद पवार गटाने मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये आतापर्यंत फक्त सात उमेदवारांची नावे उघड झाली आहेत.

Bharat Jadhav

  • मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय हालचालींना वेग

  • बीएमसी निवडणुकीसाठी शरद पवार गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर

  • पहिल्या यादीत केवळ ७ उमेदवारांची नावे

मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी प्रत्येक पक्षांनी कंबर कसलीय. युती, आघाडी आणि जागावाटपांमध्ये अडकल्यानंतर अखेर पक्षांकडून उमेदवार जाहीर होऊ लागलेत.पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केल्या जात आहेत. भाजप, अजित पवार गट, ठाकरे सेनेसह शिंदे गटाने मुंबईतील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आता शरद पवार गटाने देखील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र यादी फक्त ७ उमेदवारांची नावे देण्यात आली आहेत.

मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीसोबत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस लढणार की नाही? हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी त्यांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्या यादीत फक्त 7 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पक्षाचे मुंबई विभागीय निवडणूक प्रभारी अध्यक्ष मिलिंद कांबळे आणि सहअध्यक्ष सोहेल सुभेदार यांच्या मान्यतेने ही यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा! असं राष्ट्रवादी काँग्रेसने यादी जाहीर करताना म्हटलंय.

उमेदवारांची नावं खालीलप्रमाणे

1) वॉर्ड क्रमांक - 43 - अजित रावराणे

2) वॉर्ड क्रमांक 140 - संजय भिमराव कांबळे

3) वॉर्ड क्रमांक 78 - रदबा जावेद देऊलकर

4) वॉर्ड क्रमांक 48 - गणेश शिंदे

5) वॉर्ड क्रमांक 70 रुही मदन खानोलकर

6) वॉर्ड क्रमांक 51 - आरती सचिन चव्हाण

7) वॉर्ड क्रमांक 112 - मंजू रविंद्र जायस्वाल

यादी जाहीर होण्याआधी मुंबईत शरद पवारांना मोठा धक्का

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची यादी जाहीर करण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या महिला नेत्याने शरद पवारांची साथ सोडली आहे. राखी जाधव यांनी ऐन निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलाय. जागा वाटपावरून राखी जाधव नाराज होत्या. भाजप नेते पराग शहा यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे मुंबईत भाजपची ताकद वाढलीय.

दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची युती झालीय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला फक्त ५ ते १० जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या राखी जाधव नाराज झाल्या. कमी जागा मिळाल्यामुळे राखी जाधव आणि त्यांचे कार्यकर्ते नाराज होते. त्यातून त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत भीषण अपघात, भरधाव बसने ४-५ जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू

दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं, भाजपला दूर सारत राष्ट्रवादी एकत्र

मुंबईत राजकारण तापलं; निवडणुकीसाठी आतापर्यंत इतक्या उमेदवारांनी अर्ज घेतले, संपूर्ण माहिती एका क्लिकवर

भाजपात उपऱ्यांना उपरणे, निष्ठावतांची उपेक्षा, दलबदलू दिनकर पाटलांना निष्ठेसाठी रडू

Jalna Accident: समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना; ट्रकचा अपघात पाहणाऱ्या अख्खा कुटुंबाला ॲम्बुलन्सनं चिरडलं

SCROLL FOR NEXT