Maratha Reservation Saam tv
मुंबई/पुणे

Maratha Reservation: मुंबईत मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागर‍िकांचं सर्वेक्षण होणार, महापालिका प्रशासनाने केलं मोठं आवाहन

Vishal Gangurde

आवेश तांदळे, मुंबई

Mumbai News:

मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागर‍िकांच्या सर्वेक्षणाचे कामकाज २३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार मुंबई सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मुंबईत पालिका कर्मचाऱ्यांकडून हे सर्वेक्षण करण्यात येणा आहे. मुंबई महानगरपालिकेचे अध‍िकारी आणि कर्मचारी मुंबई शहर आण‍ि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यात सर्वेक्षण करणार आहेत. त्यामुळे या प्रशासकीय कामासाठी घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य ते सहकार्य करा, असे आवाहन मुंबई महानगरपाल‍िका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

मंगळवारपासून सर्वेक्षण सुरु होणार

राज्यभरात सुरू होणारं सर्वेक्षण मंगळवारपासून मुंबईत सुरू होणार आहे. यासाठी महानगरपाल‍िकेचे अध‍िकारी आण‍ि कर्मचाऱ्यांना आणि पर्यवेक्षकाचे प्रश‍िक्षण देण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार निर्धारित करण्यात आलेले प्रश्न नागरिकांना व‍िचारण्यात येणार आहेत. या माध्यमातून आवश्यक ती माहिती गोळा करण्यात येणार आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पालिकेकडून नागरिकांना आवाहन

या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रश‍िक्ष‍ित कर्मचारी मंगळवारपासून आपल्या घरी, सोसायटी आण‍ि अपार्टमेंटमध्ये येतील. संबंध‍ित कर्मचाऱ्यांकडे स्वत:चे ओळखपत्र असेल. त्यामुळे सर्वेक्षणासाठी येणाऱ्या मुंबई महानगरपाल‍िकेच्या कर्मचाऱ्यांना मुंबईकरांनी सहकार्य करावे आण‍ि त्यांना अपेक्ष‍ित असलेली माह‍िती भरून दयावी. ही माहिती भ्रमणध्वनीवर आधारित एका ॲपमध्ये नोंदविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेने दिली.

'नागरिकांची ही माहिती नोंदविल्यानंतर माहिती देणाऱ्याची स्वाक्षरी देखील ॲपमध्ये जतन केली जाणार आहे. तरी कृपया मुंबई महानगरपाल‍िकेतील रह‍िवाशांनी या सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 10 जणांना विषबाधा

Arvind Kejriwal: दिल्लीत मी भाजपचा प्रचार करणार, असं का म्हणाले अरविंद केजरीवाल? वाचा...

VIDEO : तुतारीसाठी अनेक उमेदवार इच्छुक; मोठी अपडेट आली समोर

UPSC Success Story : वाह रे पठ्ठ्या! २ वेळा JEE पास करून IIT सोडलं; UPSC उत्तीर्ण होऊन IAS पदाचा राजीनामा, कोण आहे 'हा' जिगरबाज तरूण?

Chembur Fire News : चेंबूरमधील आग दुर्घटनेची CM शिंदेंकडून पाहणी; मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहिर

SCROLL FOR NEXT