BMC 800 ENGINEERS TRANSFER Saam Tv
मुंबई/पुणे

BMC च्या 800 अभियंत्यांची उचलबांगडी? ठाण मांडलेल्यांच्या पुढील महिन्यात बदल्या

BMC Plans Online Transfers for 800 Engineers: BMCतील 800 अभियंत्यांची उचलबांगडी होणार असल्याची चिन्ह आहेत....मात्र अभियंत्यांच्या बदलीमागे नेमकं कारण काय? बदली प्रक्रिया कशी राबवली जाणार? पाहूयात या रिपोर्टमधून...

Snehil Shivaji

मुंबई महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून मलईदार खात्यांत ठाण मांडून बसलेल्या शेकडो अभियंत्यांची आता उचलबांगडी होणार आहे. पालिकेत एकूण साडेतीन हजार अभियंते कार्यरत असून, त्यापैकी सुमारे ८०० अभियंते गेली १० ते १७ वर्षे एकाच विभागात खुर्च्या उबवत आहेत. मलईदार खात्यांमध्ये ठाण मांडून बसलेल्या या अधिकाऱ्यांना चाप लावण्यासाठी पालिका प्रशासनाने ऑनलाईन बदलीचा मास्टरप्लॅन आखलाय. पण ही बदली प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे,

800 अभियंत्यांची होणार बदली

संगणकीय प्रणालीद्वारे पारदर्शक बदल्या

5 प्राधान्यक्रम निवडण्याची सुविधा

1 ते 15 ऑक्टोबरदरम्यान अधिकृत आदेश

दरवर्षी 25 टक्के बदल्यांचा नियम लागू

एकाच विभागात ३ वर्षांपेक्षा जास्त काळ काम करणाऱ्या अभियंत्यांची बदली होणारेय. सॉफ्टवेअरमध्ये सर्व डेटा फीड केल्याने आता कोणताच राजकीय वशिला चालणार नाही. पात्र अभियंत्यांनी ५ ते २० सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन अर्ज करून ५ पसंतीक्रम नोंदवलेत, छाननी प्रक्रिया पूर्ण करून १ ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने बदली आदेश जारी होणारेत. दरवर्षी नियमानुसार २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या अनिवार्य करण्यात आल्यायेत.

अनेक वर्षांपासून काही ठराविक विभागांमध्येच पोस्टिंग मिळवण्यासाठी अर्थपूर्ण व्यवहारातून वशिलेबाजी केली जायची. पण पालिकेच्या या ऑनलाईन आणि पारदर्शक भूमिकेमुळे भ्रष्ट संस्कृतीला मोठा पायबंद बसणार आहे. नुकतेच उसनवारीवर आलेल्या पाचशेहून अधिक अधिकाऱ्यांना मंत्रालयातून माघारी पाठवण्यात आल्यानं आता बीएमसीमध्ये देखिल सिंडिकेट मोडून काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होणार की पुन्हा सेटिंग करून ठाण मांडणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळी उपाययोजनांसाठी सरकारची धावाधाव, राज्यात लवकरच दुष्काळ जाहीर होणार

देहूगावात थरार! शेतजमिनीच्या वादातून गरोदर पत्नीचा खून; पतीने इमारतीवरून मारली उडी, संपूर्ण परिसर हादरला

Heart Attack : जिममध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात 'ही' ६ लक्षणे, दुर्लक्ष करू नका नाहीतर....

Maharashtra News Live Update: अर्धा तासाचा पावसामध्ये भिवंडी शहरात अनेक ठिकाणी साचले पाणी

हप्ता थकल्यावर आता फायनान्स कंपनीची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT