दिवा-आगासन रस्त्याच्या गलथान कारभाराविरोधात भाजपाचे निषेध आंदोलन... प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

दिवा-आगासन रस्त्याच्या गलथान कारभाराविरोधात भाजपाचे निषेध आंदोलन...

5 लाख दिवावासीयांच्या सुरक्षित प्रवासासाठी दिवा आगासन रस्ता लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे, असेही भाजपचे रोहिदास मुंडे यांनी निषेध आंदोलन करते वेळी सांगितले.

प्रदीप भणगे

दिवा: दिवा-आगासन रस्त्याच्या गलथान कारभार विरोधात भाजपने आज दातीवली येथे निषेध आंदोलन केले आहे. दिवा-आगासन रस्त्यावर (Diva-Agasan Road) अपूर्ण कामांमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अपघातात नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. वाहतूक कोंडी (Traffic) अर्धवट कामामुळे होते. याशिवाय अनेक ठिकाणी गलथान कारभारामुळे आजही अपघाताची शक्यता अधिक आहे. (BJP's protest agitation against incomplete management of Diva-Agasan road)

हे देखील पहा -

नुकताच एका तरुणाला रस्त्याच्या गलथान कारभारामुळे जीव गमवावा लागला. वारंवार मागणी करूनही हा रस्ता वेळेत पूर्ण केला जात नाही. या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी भाजपचे (BJP) पदाधिकारी रोहिदास मुंडे यांनी यावेळी केली. 5 लाख दिवावासीयांच्या सुरक्षित प्रवासासाठी दिवा आगासन रस्ता लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे, असेही भाजपचे रोहिदास मुंडे यांनी सोमवारी निषेध आंदोलन (Agitation) करते वेळी सांगितले. दिवा-आगासन रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असल्याने हा रस्ता अपघात व वाहतूक कोंडीचा रस्ता झाला आहे, असे रोहिदास मुंडे यांनी यावेळी सांगितले. तसेच मागील काही वर्षांत हा रस्ता पूर्ण होऊ शकला नाही.रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले बसवण्यात येतात.

नागरिकांना चालण्यास जागा उपलब्ध नाही याकडे सत्ताधारी लोकांचे लक्ष नाही असा आरोपही मुंडे यांनी केला आहे. या आंदोलनात भाजपचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश पाटील, विजय भोईर, सचिन भोईर, रोशन भगत, जयदीप भोईर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: धारावीतून ज्योती गायकडवाड आघाडीवर

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

SCROLL FOR NEXT