Kalyan News Saam Tv News
मुंबई/पुणे

Kalyan News: 'मै हँ डॉन...'; भाजप कार्यकर्त्याने भर कार्यक्रमात बंदूक नाचवली, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

BJP worker dances with revolver: कल्याणमधील एका हळदी कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एक व्यक्ती हळदी समारंभात चक्क रिव्हॉल्वर घेऊन बॉलिवूडच्या एका गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

Bhagyashree Kamble

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

कल्याण डोंबिवलीत लग्न, हळदी समारंभात फायरिंग झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तर काही अति उत्साही लोक वाढदिवसाला तलवारी नाचवतात. इतकंच नाही तर, काही जण तलवारीने केक कट करतात. अशातच कल्याण पश्चिमेतील हळदी समारंभातील एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातात रिव्हॉल्वर घेऊन बॉलिवूडच्या एका गाण्यावर थिरकताना दिसत आहे आणि तो व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता आहे.

कल्याणमधील एका हळदी कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हळदी समारंभात चक्क हातात रिव्हॉल्वर घेऊन बॉलिवूडच्या एका गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या व्यक्तीचे नाव चिंतामण लोखंडे असून, हा व्यक्ती प्रसिद्ध व्यावसायिक आणि भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये भाजपचा कार्यकर्ता बॉलिवूडच्या 'मैं हूँ डॉन' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. हा व्हिडिओ कल्याण पश्चिमेकडील उंबर्डे येथील असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, हळदी समारंभात हातात रिव्हॉल्वर घेऊन नाचल्यामुळे त्याचा व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. रिव्हॉल्वर नाचवताना चुकून काही अनुचित प्रकार घडू शकतो, याची साधी दक्षता त्या व्यक्तीनं घेतलेली नाही. सार्वजनिक ठिकाणी काहींनी लायन्सन असले तरी अशा प्रकारे हत्यार काढून मिरवणं कितपत योग्य आहे? असा सवाल काही नागरीकांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप! बड्या नेत्यानं सोडली शरद पवार गटाची साथ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पोला धडक; ४ जीवलग मित्रांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Apple cutting Tips: सफरचंद कापल्यानंतर काळे का पडतात?

Bridal Look Care: या ५ चुकांमुळे नेहमी खराब होतो ब्राइडल लूक...; तुमचं लग्न जर यावर्षी ठरलं असेल तर घ्या ही काळजी

SCROLL FOR NEXT