nana patole and chitra wagh  saam tv
मुंबई/पुणे

काय नाना… तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटीलातं? चित्रा वाघांनी महिलेसोबतचा व्हिडिओ केला ट्विट

कथित व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नाना पटोले यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून टीकेचे झोड उठवली जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नाना पटोलेंचा व्हिडीओ ट्विट करत निशाणा साधला आहे.

साम टिव्ही ब्युरो

जयश्री मोरे-भिसे

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा एका हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात टाकून खुर्चीवर बसल्याचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नाना पटोले यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून टीकेचे झोड उठवली जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी नाना पटोलेंचा व्हिडीओ ट्विट करत निशाणा साधला आहे. 'काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलातं',असं कॅप्शन व्हिडीओला दिलं आहे. ( Chitra Wagh News In Marathi)

चित्रा वाघ यांनी माध्यमांशी बोलताना देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली. चित्रा वाघ म्हणाल्या, 'सोलापूर असो किंवा नाना पटोले असून दे. लोकप्रतिनिधी असू दे. तुमची जबाबदारी कित्येक पटीने असते. सोलापूरच्या प्रकरणात आमच्या पक्षाने तात्काळ कारवाई केली. लोकप्रतिनिधींकडून काय बोध घ्यावा ? खासगी गोष्ट सार्वजनिक डोमेनमध्ये येते, तेव्हा ती खासगी राहत नाही'.

चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, 'माझ्याकडे व्हिडीओ आला, मी पाहिल्यानंतर मला पण आश्चर्य वाटलं. मी पुन्हा एकदा तपासलं. बराच ठिकाणी तो व्हिडीओ होता. महाराष्ट्रातल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. म्हणूनच राककीय वातावरणामध्ये ज्या काही गोष्टी घडताना दिसतात, त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. मी सुद्धा त्यांना प्रश्न विचारला. ज्या पद्धतीने ट्रोल केलं ते चुकीचं आहे. नानांचा व्हिडीओ आला तो धक्कादायक आहे. सोलापूर कुठलाही असू दे आमच्या हातात असेल, तेव्हा राजीनामे दिले. आपल्या सगळ्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे'.

दरम्यान, सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नाना पटोले म्हणाले, 'सदर व्हिडीओवरून आमच्या तक्रारी सुरू आहेत. आमच्या लीगल सेलकडून तक्रारी करण्याचे सुरू आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडीओ मॉर्फ केलेला असून यामागे भाजपचे कटकारस्थान आहे. यावर कायदेशीर बाबी आमची लीगल टीम तपासत आहे. मला बदनाम करण्याचं कटकारस्थान सुरू आहे. त्याच्या विरोधात कारवाई करण्याचं काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT