Sharad Pawar and uddhav thackeray File photo  saam tv
मुंबई/पुणे

'उद्धव ठाकरे हे शरद पवारांना विचारल्याशिवाय काहीच करत नाहीत'; भाजपची जोरदार टीका

'उद्धव ठाकरे हे शरद पवार आणि सोनिया गांधींना विचारल्याशिवाय काहीच करत नाहीत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी टीका केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

Chandrashekhar Bawankule news : शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेनेवर मोठं पक्ष संकट उभ ठाकलं आहे. या संकटसमयी संभाजी ब्रिगेडने शिवसेनेला पाठिंबा दर्शविला आहे. आज पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येणार अशी घोषणा आज संभाजी ब्रिगेड आणि उद्धव ठाकरे यांच्यातर्फे करण्यात आली आहे. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

'उद्धव ठाकरे हे शरद पवार आणि सोनिया गांधींना विचारल्याशिवाय काहीच करत नाहीत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी टीका केली आहे.

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या आघाडीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडसोबत युती करताना नक्कीच शरद पवार आएणि सोनिया गांधी यांना विश्वासात घेतले असणार. कारण या दोघांना विचारल्याशिवाय उद्धव ठाकरे काहीच करत नाहीत', अशा शब्दात बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

'२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत बेइमानी करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती केली. या अभद्र युतीमधून महाविकास आघाडी सरकार नावाची हिंदू विरोधी आघाडी जन्मास आली. परंतु उद्धव ठाकरे यांच्याच पक्षातील आमदारांना हे पटले नाही. त्यामुळे त्यांच्या आमदारांनी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी त्यांची साथ सोडली. सदर आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानाने भाजपसोबत आले, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, 'आता उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड सोबत युती केली. ही नवी युती उद्धव ठाकरेंसोबत शिल्लक असलेल्या उर्वरित १५ आमदारांना मान्य राहणार आहे का ? महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्यासाठी उद्धव ठाकरे यांची ही धडपड तर नाही ना ? उद्धव ठाकरे यांच्या या नव्या ब्रिगेडचे काँग्रेस पक्ष स्वागत करणार का? वैफल्यग्रस्त झालेले उद्धव ठाकरे हे उद्या कुणासोबत युती करतील याची शाश्वती आता राहिलेली नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

Sonalee Kulkarni: हॉट अन् बोल्ड सोनाली कुलकर्णी, लेटेस्ट फोटोंनी उडवली झोप

Shocking : खिशात पैसा नाही, मुलांसाठी दिवाळीत कपडे अन् फराळ कुठून आणू?, चिंतेतून शेतकऱ्याने संपवलं आयुष्य

Virat Kohli: विराट पुन्हा शून्यावर आऊट; एडिलेड वनडेनंतर घेणार निवृत्ती? विकेटनंतर क्राऊडला केलेल्या इशाऱ्यामुळे चर्चांना उधाण

BSNL कडून ज्येष्ठ नागरिकांसाठी "सम्मान प्लॅन" लाँच, वर्षभरासाठी दररोज २ जीबी डेटा आणि कॉलिंग; किंमत किती?

SCROLL FOR NEXT