Bhaskar Jadhav News  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : भास्कर जाधव हे ठाकरेंची आयटम गर्ल; भाजप आमदाराची जीभ घसरली

भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांची आयटम गर्ल असल्याचं वादग्रस्त विधान प्रसाद लाड यांनी केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Shivsena vs BJP : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील आमदार भास्कर जाधव आणि राणे कुटुंबीय यांच्यात शाब्दिक वाद सुरू आहे. या दोघांमध्ये आरोप प्रत्योरापाचा कलगितूरा रंगला असताना भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी या वादात उडी घेतली आहे. भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांची आयटम गर्ल असल्याचं वादग्रस्त विधान प्रसाद लाड यांनी केलं आहे.

काय म्हणाले प्रसाद लाड?

'चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालावा म्हणून एक आयटम साँग असतं. अगदी तशाच प्रकारे भास्कर जाधव हे आयटम गर्ल आहेत, असा हल्लाबोल प्रसाद लाड यांनी केला. संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून बोलताना प्रसाद लाड यांनी भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला.

'मी भास्कर जाधव यांचं भाषण ऐकलं. ते खूप नाटक करतात, भास्कर जाधव यांचं नाव आयटम गर्ल ठेवुया. अशी बोचरी टीका प्रसाद लाड यांनी केली. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालावा म्हणून एक आयटम साँग असतं. अगदी तशाच प्रकारे उद्धव ठाकरेंचे भास्कर जाधव हे आयटम गर्ल आहेत', असं वादग्रस्त विधान प्रसाद लाड यांनी केलं.

इतकंच नाही तर, उद्धव ठाकरे यांच्यात एवढीच ताकद होती, तर भास्कर जाधव यांना मंत्री का केलं नाही? असा सवालही लाड यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर भास्कर जाधव यांचा बदला घेतल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही, असंही प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Maharashtra News Live Update: मिरा-भाईंदरमध्ये केमिकलच्या मदतीने नोटा तिप्पट करण्याचे आमिष; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

SCROLL FOR NEXT