Ram Mandir Inauguration Saam Digital
मुंबई/पुणे

Ram Mandir Ayodhya: राम मंदिर लोकार्पणाच्या दिवशी महाराष्ट्रात दारू आणि मांसबंदी करा, भाजप आमदाराची मागणी

Ram Mandir News: येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे.

साम टिव्ही ब्युरो

Ram Mandir Inauguration:

येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. याशीच संबंधित एक बातमी समोर येत आहे. भाजप आमदार राम कदम यांनी राम मंदिर प्रतिष्ठापना दिवशी महाराष्ट्रात एक दिवसासाठी दारू आणि मांसबंदी करावी, अशी मागणी केली आहे.

काय म्हणाले राम कदम?

राम कदम म्हणाले आहेत की, 22 जानेवारी रोजी अयोध्येत फार मोठ्या संघर्षानंतर राम मंदिर भव्य आणि दिव्य स्वरूपात उभं राहत असून प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. 450 वर्षांच्या संघर्षानंतर कोट्यवधी राम भक्त ही दिवाळी साजरी करणार आहे. या पवित्र दिनी महाराष्ट्रात एक दिवसासाठी दारू आणि मांसबंदी करावी, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते म्हणाले आहेत की, ''महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला सांगून संपूर्ण देशात 22 जानेवारी रोजी दारू आणि मांसबंदी करावी, अशी मागणी कोट्यवधी राम भक्तांची आहे.''  (Latest Marathi News)

दरम्यान, अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य मंदिरातील रामललाच्या मूर्तीचा अभिषेक 22 जानेवारीला होणार आहे. त्यापूर्वी प्रभू रामाच्या तीन पैकी एका मूर्तीची निवड करण्यात आली आहे. देशातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या राम, सीता आणि हनुमानाच्या मूर्तींची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटवरवर ही माहिती दिली आहे.

याबाबत ट्विट करत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लिहिले की, "जिथे राम आहे, तिथे हनुमान आहे. अयोध्येत प्रभू रामाच्या अभिषेकासाठी मूर्तीची निवड अंतिम टप्प्यात आली आहे. देशाचे प्रसिद्ध शिल्पकार शान योगीराज अरुण यांनी बनवलेली रामची मूर्ती अयोध्येत बसवली जाणार आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT