Prashant Thakur Saam Tv
मुंबई/पुणे

भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांना धक्का; भूखंड वाटप रद्द करण्याचे नगरविकासचे आदेश (Video)

या भूखंडाची किंमत 300 कोटी एवढी आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात भाजप (BJP) विरुध्द महाविकास आघाडी वाद दिवसेंदिवस वाढत आहे. आता भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर (Prashant Thakur) अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या पत्नीच्या नावे वाटलेला भूखंड रद्द करण्यात आला आहे. या भूखंडाची किंमत 300 कोटी एवढी आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उलवे पुष्पक नगर येथील मोक्याच्या ठिकाणी ही जमीन आहे.

भाजपचे (BJP) आमदार प्रशांत ठाकूर हे सिडकोचे अध्यक्ष असताना 2019 मध्ये या जमीनीचे वाटप करण्यात आले आहे. उलवे पुष्पक नगर येथील मोक्याच्या ठिकाणी 35780 चौरस मीटर चा प्लॉट आहे. या प्लॉटची आताच्या बाजारभावाप्रमाणे किंमत काढल्यास तब्बल 300 कोटींच्या घरात जात असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हे देखील पहा

या जमीन संपादनात गैरप्रकार असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे (Congress) सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी नगरविकास खात्याकडे केली होती. नगरविकास खात्याने केलेल्या चौकशीत भूखंड वाटपात अनियमितता झाल्याचे निर्देशनास आल्याने सदर भूखंड वाटप रद्द करण्याचे आदेश नगरविकास खात्याने सिडकोला दिले आहेत.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT