Nitesh Rane On CM Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

...अन्यथा रस्त्यावर उतरू; अनधिकृत शाळांच्या मुद्द्यावरुन नितेश राणे भडकले

Nitesh Rane On CM Uddhav Thackeray : अनधिकृत शाळांचे लागेबांधे व हितसंबंध प्रशासनातील अधिकाऱ्यांशी असणार हे स्पष्ट आहे असा आरोप त्यांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुंबईतील अनधिकृत शाळांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या अनधिकृत शाळांवर (Illegal schools in Mumbai) कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन (Agitation) करण्याचा इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. (BJP MLA Nitesh Rane Writes Letter To Cm Uddhav Thackeray About Illegal Schools In Mumbai)

हे देखील पाहा -

टक्केवारीसाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याचं वाटोळं

नितेश राणे आपल्या पत्रात म्हणाले की, आपल्या प्रगतशील महाराष्ट्रात शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मुलभूत अधिकार आहे. शाळेच्या गुणवत्तेवर आणि शिक्षणाचा दर्जावर राज्य सरकार आणि महापालिकेचं लक्ष असणं त्यांचं योग्य नियमन करणं हे आपले कर्तव्य आहे. परंतु मुंबईत मात्र या शिक्षणाच्या नावाखाली प्रशासनाला हाताशी धरून टक्केवारीसाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याचं वाटोळं करण्याचा जणू काही महापालिकेतील अधिकाऱ्यांनी विडाच उचलेला दिसतोय, मुंबई महापालिकेची मान्यता न घेता मुंबई तब्बल २६९ अनधिकृत शाळा सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे असं नितेश राणे म्हणाले आहेत.

मुंबईत अनधिकृत शाळांचं रॅकेट

नितेश राणे म्हणाले की, हा काळाधंदा नेमका कुणाच्या आर्शिवादाने सुरू आहे? याची माहिती पालकांना मिळाली पाहिजे. या शाळाच जर बेकायदेशीर असतील या विद्यार्थ्याचे शैक्षणिक पात्रातच धोक्यात येणार नाही का? दिखाव्यापुरते अनधिकृत शाळांना महापालिका नोटीसा बजावते मात्र सोयीस्कररित्या त्यांच्यावर दंडात्मक कारवाई राज्यसरकारकडून का टाळली जाते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे आपण मुंबईतील महापालिकेच्या शाळांचे कौतुक करत आहात, मात्र त्याच मुंबईत अनधिकृत शाळांचं रॅकेट गेल्या दहावर्षापासून चालवलं जात आहे याचाच अर्थ अनधिकृत शाळांचे लागेबांधे व हितसंबंध प्रशासनातील अधिकाऱ्यांशी असणार हे स्पष्ट आहे असा आरोप त्यांनी केला आहे.

अन्यथा रस्त्यावर उतरू

नितेश राणे पुढे म्हणाले की, आपण लवकरात लवकर या गंभीर प्रश्नाकडे जातीने लक्ष द्यावं. संबंधित अधिकाऱ्यांवर आणि शाळांवर कठोर कारवाई करून या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी तातडीने उपाय योजना कराव्यात. अन्यथा आम्हाला विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रातून दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

SCROLL FOR NEXT