Sharad Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Nawab Malik: 'पवारसाहेब मलिक मुस्लिम आहेत, म्हणून राजीनामा घेत नाहीत का?'

'पवारसाहेबांना विचारायचं आहे. ज्याचे दाऊदशी संबंध आहे त्याचा राजीनामा का घेत नाही.'

जयश्री मोरे

मुंबई : महापालिकेचं (BMC) युद्ध जिंकण का महत्वाचं आहे. हे संम्मेलन तळागळातील सहकारी ज्यांच्यामुळे आम्ही पोहचतो शेवटच्या मतदारांपर्यंत पोहचणे महत्वाचं आहे. पंतप्रधानाचे विचार फडणवीसांचे विचार पोहचवणे गरजेच आहे. मुंबईत चांगल जीवन जगायचं असेल, तर निवडणुका लागणार आहेत. आचार संहिता लागणार आहे. जनतेला समजावावं लागेल की भाजपाचा झेंडा मुंबईकरांच्या अस्मितेचा आहे. असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी केलं. ते आज आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेंबूरमध्ये वॉर्डमध्ये वॉर्ड कार्यकर्ता संम्मेलन आयोजित केलं होतं त्या कार्यक्रमात बोलत होते.

ते म्हणाले, १९९२-९३ ला हिंदुत्वाचा मुद्दा जिवंत ठेवण्यासाठी भाजप आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी हातभार लावला तसंच १९९३ मध्ये लोकांची घर उध्वस्त केली यासाठी आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा मागतोय, पवारसाहेब (Sharad Pawar) फार मोठे नेते आहेत. पवारसाहेबांना विचारायचं आहे. ज्याचे दाऊदशी संबंध आहे त्याचा राजीनामा का घेत नाही आणि अनिल देशमुख मराठी आहेत म्हणून त्यांचा राजीनामा घेतला का? नवाब मलिक मुस्लिम आहे म्हणून राजीनामा घेत नाही का? असा सवाल राणे यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, विधीमंडळात वाघाचा मांजर झाला म्हणून मी म्याव म्याव म्हणालो तर मी चुकीचा झालो, असही ते म्हणाले.

दंगल करण्याची एकाची हिम्मत झाली नाही -

संजय राऊत यांनी काय अपशब्द काढले मी वाचून दाखवू शकतो आणि ते नवाब मलिक यांच्या घरी जाऊन सात्वन करत आहेत. तरुणांना बर्बाद करण्याचं काम नवाब मलिक करत आहे. सगळे एका माळेचे मणी आहेत. एकाच दुखल की दुसऱ्याला लागत सगळे एकमेकांना आयोडेक्स लावत आहेत. मोदींनी राम मंदिर बांधल, ३७० हटवलं तेव्हा दंगल झाली नाही बाहेर पडण्याची दंगल करण्याची एकाचीही हिम्मत झाली नाही. मुंबई विकणाऱ्या लोकांची सत्ता नको मुंबईकडे कोणी वाकड्या नजरेनी पाहत असतील तर आरे ला कारे करणाऱ्याची सत्ता आली पाहिजे असही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बदलापूरच्या घटनेनंतर 'प्री प्रायमरी' शाळा शासनाच्या अखत्यारीत आणणार

Masale Bhaat: नेहमीच्या मसाले भाताला द्या कोल्हापूरी तडका; ही ट्रिक एकदा वापरुनच बघा

Trendy Cotton Clothes: ट्रेंडी अन् स्टायलिश कॉटन कपड्याचे कलेक्शन, महिलांसाठी ठरतील बेस्ट

Winter Saree Fashion : थंडीला टाटा बाय-बाय! स्वेटरसोबत 'अशी' स्टाइल करा साडी, तुमच्या ग्लॅमरस लूकवरून नजर हटणार नाही

Dry fruits Halwa : शरीराला ताकद मिळेल एकदा करुनच बघा पौष्टिक ड्रायफ्रुट्स हलवा, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT