Ganpat Gaikwad Tweet Saam tv
मुंबई/पुणे

Ganpat Gaikwad Tweet: '...त्यांना सर्व जग विदूषक असल्याचा भास होतो'; भाजप आमदाराचा नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदेंवर निशाणा

Kalyan Political News: कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या ट्विट करत निशाणा साधला आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, कल्याण

Kalyan Political News:

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट भाजपमधील वाद टोकाला गेल्याचे समोर आले आहे. कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या ट्विट करत निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

'ज्यांना गद्दारी करून कमी वेळात अमाप पैसा आणि सत्तेचं बळ मिळाले आहे. त्यांना त्यांच्या नजरेने सर्व जग विदूषक आहे असा भास होतो, असं ट्विट करत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

डोंबिवलीत मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू झाला. हा वाद आता मिटल्याचे वरिष्ठ नेत्यांकडून सांगितले गेले होते. परंतु भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या घरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली होती.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या भेटीदरम्यान भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दुजाभाव होत असल्याची व्यथा त्यांच्यासमोर मांडली होती. हा वाद सुरू असताना भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी ट्विट करत श्रीकांत शिंदे यांच्यावर हल्लाबोल केल्याने आता हा वाद अजून पेटणार आहे अशी शक्यता वर्तविली जात आहे.

आमदार गणपत गायकवाड यांच्या वक्तव्याचा विपर्यास

तिन्ही राज्यातील भाजपला मिळालेल्या विजयानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघात भाजपचा जो उमेदवार असेल, त्याला निवडून आणू, असे वक्तव्य केलं होतं. त्याचा विपर्यास करुन त्याला प्रतिउत्तर देत कोणी काही बोलत असल्यास त्याला महत्व राहत नाही, असे स्पष्टीकरण भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी केलं आहे.

भाजपने स्पष्टीकरण दिल्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे व भाजप मधील दरी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Shetty House Firing Case: रोहित शेट्टी घरावर गोळीबार प्रकरणात पुणे कनेक्शन उघड, कर्वेनगरमधून चौघांना अटक

Union Budget 2026: कपडे, शूजपासून औषधांपर्यंत, अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग? वाचा संपूर्ण यादी

Kidney Failure: वारंवार थकवा जाणवतो? किडनी निकामी होण्याचे असू शकते लक्षण, वेळीच व्हा सावध अन् वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Accident News : बुलढाण्यात अपघाताचा थरार! महिला मजुरांच्या ऑटोला भरधाव कारची जोरदार धडक; ८ जण गंभीर, एका महिलेचा मृत्यू

Rohit Shetty: घराबाहेर गोळीबार झाला तेव्हा रोहित शेट्टी कुठे होता? हल्लेखोराबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT