BJP Mla Ganpat Gaikwad Firing Mahesh Gaikwad Saam TV
मुंबई/पुणे

BJP Mla Firing: शिंदे गटाच्या नेत्यावर भाजप आमदाराकडून गोळीबार; पोलीस ठाण्यातच घडला थरार, मुंबईत खळबळ

BJP Mla Firing Shinde Group: भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.

Satish Daud

BJP Mla Ganpat Gaikwad Firing

मुंबईच्या उल्हासनगर परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धक्कादायक बाब म्हणजे, हिललाईन पोलीस ठाण्यातच शुक्रवारी (२ फेब्रुवारी) मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार थरारक प्रकार घडला. या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांना तातडीने उपचारासाठी ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

गोळीबाराची माहिती मिळताच भाजपसह शिंदे गटाच्या (Eknath Shinde) कार्यकर्त्यांनी रुग्णालयासमोरच मोठी गर्दी केली होती. दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील आमदाराची गोळीबार करण्यापर्यंत मजल जातेच कशी? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.

शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार, नेमकं काय घडलं?

कल्याण पूर्वेत शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि भाजपा आमदार गणपत गायकवाड (Mla Ganpat Gaikwad) यांच्यात नेहमीच वादावादी तसेच आरोप प्रत्यारोप होत होते. वरिष्ठांनी मध्यस्थ केल्यानंतर देखील दोघांमधील धूसफूस कायम होती . शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दोन्ही नेते पुन्हा आमने-सामने आले.

प्रकरण हिललाईन पोलीस ठाण्यापर्यंत गेलं. यावेळी संतापलेल्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर एकापाठोपाठ एक ५ गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले. तर त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील यांना देखील गोळी लागली.

याप्रकरणी हिल लाईन पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथामिक माहिती आहे. या घटनेनंतर कल्याण पूर्वेत पुन्हा भाजप व शिंदे गट आमने-सामने उभे ठाकण्याची शक्यता आहे. कल्याण पूर्वेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

SCROLL FOR NEXT