bjp news  Saam tv
मुंबई/पुणे

भाजपची नवी मुंबईत गेमचेंजर खेळी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची मोठी घोषणा

bjp navi Mumbai : भाजपने नवी मुंबईत गेमचेंजर खेळी खेळली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापन समितीच्या कार्यकारिणीची घोषणा चव्हाण यांनी केली आहे.

Saam Tv

भाजपच्या रविंद्र चव्हाण यांच्याकडून नवी मुंबईत मोठी खेळी

कर्मचारी संघटनेच्या नवी मुंबई विमानतळाच्या व्यवस्थापन समितीच्या कार्यकारिणीची घोषणा

अखिल भारतीय माथाडी संघटनेची कार्यकारिणीचीही घोषणा

अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापन समितीच्या कार्यकारिणीची भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून घोषणा करण्यात आलीये. भाजपने कार्यकारिणीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र दिले. तसेच नवनियुक्त पदाधिकार्याऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यकारिणीची घोषणा करताना भाजप प्रदेश अतुल काळसेकर, अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे सुहास माटे , संयुक्त सरचिटणीस रुपेश धुमाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अखिल भारतीय माथाडी संघटनेची कार्यकारिणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

रविंद्र चव्हाण काय म्हणाले?

भाजप प्रदेशाध्य रविंद्र चव्हाण म्हणाले की , पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामध्ये तळागाळातील प्रत्येक घटकाला न्याय देणे, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मिळून काम करायचं आहे. कोणावरही अन्याय होणार नाही आणि करणार देखील नाही, या भूमिकेतून काम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे'.

समितीच्या कार्यकारिणीमध्ये संयुक्त सरचिटणीस रुपेश धुमाळे, उपाध्यक्ष किरण पवार, युहान केर्सी दोराबाजी आणि सुजित न्यायनिर्गुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यावेळी अखिल भारतीय माथाडी संघटनेची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यावेळी रायगड जिल्हा अध्यक्षपदी जितेश शिंदे, भिवंडी पालघर जिल्हा उपाध्यक्षपदी सचिन जोशी, ठाणे उरण उपाध्यक्षपदी विक्रांत भोसले पदी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

आमदार गोपीचंद पडळकरांवर डीडीएसआर ग्रुपचे गंभीर आरोप

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवी मुंबईतील आयआरएस अधिकारी सचिन मोटे आणि डीडीएसआर बिल्डरवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी डीडीएसआर ग्रुप कडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे गोपीचंद पडळकर यांचं तालुक्यातील राजकीय अस्तित्व धोक्यात आलं आहे, त्यामुळे ते बिनबुडाचे आरोप करताहेत. पडळकरांनी केलेले आरोप सिद्ध करावे, असं प्रत्युत्तर ग्रुपकडून देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satbara Utara : कामाची बातमी! ५ मिनिटात घरबसल्या काढा सातबारा, फक्त ₹१५ होणार खर्च; पाहा 7/12 ऑनलाइन काढण्याची सोपी प्रोसेस

जरांगेंची मंत्री विखे पाटलांकडे खळबळजनक मागणी, परळीवाल्या आता...; काय घडलं? VIDEO

Maharashtra News Live Update: रानडुकरांच्या हैदोसामुळे शेतकऱ्याचे उभे केळीचे पीक जमीन दोस्त

डायबिटीजमध्ये किवी खावा की नाही? रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'हे' फळ ठरेल फायदेशीर

RCB vs GT IPL 2026 Final: कोण जिंकणार आयपीएल २०२६चा कप? RCB आणि GT मधील महसंग्राम कुठे, केव्हा आणि कसा पहाल?

SCROLL FOR NEXT