bjp and nana patole  saam tv
मुंबई/पुणे

'प्रादेशिक पप्पू होण्यासाठी तुम्ही धडपड करत आहात'; भाजपने 'त्या' विधानावरून साधला नाना पटोलेंवर निशाणा

नाना पटोले यांच्या एका विधानावरून त्यांच्यावर भाजपने ट्विट करत निशाणा साधला आहे.

Vishal Gangurde

Maharashtra Political News : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. 'नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) चित्ते हे नायजेरियातून आणले आणि त्यांच्यामुळे लम्पी हा रोग भारतात आला, असे विधान नाना पटोले यांनी केले आहे. नाना पटोले यांच्या याच विधानावरून त्यांच्यावर भाजपने ट्विट करत निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र भाजपने ट्विट करत नाना पटोले यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 'राज्यात महाराष्ट्र काँग्रेस हे सर्कस आहे. नाना पटोले त्यात जोकर आहेत. नाना, चित्ते नामीबियामधून आणले आहेत. नायजेरिया मधून नाही. प्रादेशिक पप्पू होण्यासाठी तुम्ही धडपड करत आहात, आमच्या शुभेच्छा तुम्हाला'.

'अहो, नाना पटोले, तुम्हाला माहिती नसेल तर माहिती घ्या. जनावरांवरील 'लंप्पी' रोग हा सर्वप्रथम काँग्रेस शासित राज्य राजस्थानमध्ये आढळला. तिथून पसरता देशभरात. कोविड काळात काँग्रेस शासित राज्यांनी कोविड पसरवून दिला तसे 'लंपी' बद्दल केलं', अशा आशयाचे ट्विट भाजप महाराष्ट्रने केले आहे.

'नाना पटोले यांनाच लम्पी आजार झालाय'; बावनकुळे यांची टीका

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामीबियामधून चित्ते भारतात आणल्याने लम्पी हा आजार भारतात आला' या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे. 'नाना पटोले यांनाच लम्पी आजार झाला अशी शंका येते, असे बेताल प्रतिउत्तर बावनकुळे यांनी दिलं.

दरम्यान, लंपी व्हायरसने देशभरात ५८ हजारांहून अधिक गायींचा बळी घेतला आहे. राजधानी दिल्लीच्या विषाणूच्या संसर्गाची १७३ पेक्षा अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहे. आतापर्यंत देशातील अनेक राज्यात हा आजार पसरला आहे. याच लंपी आजारावरून नाना पटोले यांनी भाष्य केलं. नाना पटोले यांनी मोदींनी चित्ते हे नायजेरियातून आणले आणि त्यांच्यामुळे लंपी हा रोग भारतात आला असा आरोप त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT