Narayran Rane  Saam Tv
मुंबई/पुणे

Narayan Rane : 'नारायण राणेंवर टीका करायला सेनेत पुरुष उरला नाही, म्हणून अंधारेबाई...'

नारायण राणे यांनी ठाकरे गटावर खरमरीत टीका केली.

साम टिव्ही ब्युरो

Narayan Rane News : भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची शिवसेना ठाकरे गटावर जोरदार टीका सुरूच आहे. नारायण राणे यांनी ठाकरे गटावर खरमरीत टीका केली. 'शिवसेनेत नारायण राणेंवर टीका करायला कोणी पुरूष उरला नाही, म्हणून ती अंधारेबाई सिंधुदुर्गमध्ये गेली. त्यावर काहीजण टाळ्या वाजवतात, अशी खरमरीत टीका नारायण राणे यांनी ठाकरे गटावर केली. (Latest Marathi News)

मुंबईच्या भांडुपमध्ये कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात नारायण राणे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली.

नारायण राणे (Narayan Rane) उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले,'गेली २०-२५ वर्षे हा कोकण महोत्सव सुरू आहे. महोत्सव मुंबईमध्ये सुरू करण्याचा माझा हेतू वेगळा होता. कदाचित आता साध्य झाला असेल. मराठी माणूस हा व्यवसाय करायला पाहिजे. त्याला व्यवसायात आणण्यासाठी हा महोत्सव आहे. कोकणातून अनेक जण नोकरीनिमित्त आले पण व्यवसाय करायला क्वचित कोणी आले असेल'.

'मला बाळासाहेब ठाकरे यांनी 1990 मध्ये कोकणात आमदार म्हणून पाठवले. आज कोकणातील माल एक्स्पोर्ट होतोय.आधी बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेने आणि आता भाजपच्या कृपेने दहा पद मिळाली. पण मी हाजी हाजी नाही केली, असे नारायण राणे म्हणाले.

'आता शिवसेनेत नारायण राणेंवर टीका करायला कोणी पुरुष उरला नाही. म्हणून ती अंधारे बाई सिंधुदुर्गमध्ये गेली. काही जण टाळ्या वाजवतात, अशी टीका राणे यांनी केली.

'इथे एक जवळच एक संपादक आहे. तू कोणाला सांगतो येऊन दाखव. त्या उद्धव ठाकरेंचे योगदान किती? आयत्या बिळावर नागोबा आहेत, आताचे शिवसैनिक. शिवसेना मोठी करण्यात माझं योगदान आहे. संपादक आहेस तर चांगलं लिह, असे ते पुढे म्हणाले.

'हा खासदार हे माझं पाप आहे. एकदा बाळासाहेब ठाकरे यांनी मला बोलावलं. त्यांनी यांना संपादक बनवं सांगितलं. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संजय राऊत यांच्या विरोधात उमेदवार तयार ठेवला होता. पण मला बाळासाहेब यांनी हेच नाव सांगितले होते, असे राणे पुढे म्हणाले.

'त्यांचे नाव निवडणुकीच्या यादीत नव्हते. काँग्रेसच्या रोहिदास पाटील यांनी विरोध केला होता. राऊत यांना खासदार बनवायला मी खर्च केला. खर्च मी सांगणार नाही. आणि हा मला विचारतो. आता याची रवानगी जेल मध्येच... एवढी हेराफेरी आहे ना याची... कोणाच्या अंगावर केसेस नाहीत, अशी टीका राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

'आता काय अवस्था आहे...सेनेचे 40 आमदार दिवसा ढवळ्या निघून जातात. हे दुसऱ्यांना खोके म्हणतात.आम्ही काय गुच्छ घेऊन जायचो?आम्ही कुठे कुठे काय काय पोहोचवलं आता सांगायला लावू नका? अशा शब्दात राणे यांनी ठाकरे गटावर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

SCROLL FOR NEXT