Maratha Reservation :  Saam tv
मुंबई/पुणे

Maratha Reservation Issue : 'मि. जरांगे, मला शिवीगाळ करताना...; भाजप नेत्याकडून पुन्हा एकदा खुलं आव्हान

Prasad Lad on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावरील टीकेनंतर भाजप नेत्याकडून खुलं आव्हान दिलं आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आणि भाजप नेत्यांमध्ये जुंपली आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्याकडून गुरुवारी प्रसाद लाड यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. मनोज जरांगे यांच्या टीकेनंतर आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'मि. जरांगे, असं म्हणत भाजप नेते प्रसाद लाड यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं. तसेच मराठा आरक्षणावरून प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना चर्चेचं आव्हान दिलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेनंतर भाजप नेते प्रसाद लाड यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपाचंही खंडण केलं. 'बाय द वे, मि. जरांगे, मराठा समाजाला न्यायाची अपेक्षा आहे, 'नरेटिव्ह'ची नाही. मला शिविगाळ करताना जो आकांडतांडव केला. जे प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीसांच्या एसपीने नाकारले असे सांगितले, त्याची मूळ हकिकत जाणून घ्या', असे प्रसाद लाड म्हणाले.

'हे प्रकरण ठाणे एसपींच्या हद्दीतील नसून तर ठाणे पोलीस आयुक्तांच्या हद्दीतील आहे. सखाराम रामचंद्र ढाणे, जिंतूर, परभणी यांनी 6 जून 2024 च्या जाहिरातीनुसार 2023-2024 चे नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. त्यांच्याकडे 2024-25 या वर्षाचे प्रमाणपत्र होते. त्यामुळे त्यांनी स्वत: एक प्रमाणपत्र भरून खुल्या प्रवर्गातून संधी देण्यात यावी, असे हमीपत्र दिले, असे ते म्हणाले.

'आमची तीच अपेक्षा आहे, तुम्ही योग्य माहिती घेत जा. त्यानंतर बोलत जा. मी पुन्हा सांगतो, मी मराठा समाजासाठी कितीही शिविगाळ ऐकायला तयार आहे. पण, मराठा समाजासाठी 60 वर्षांत कुणी काय केले आणि कुणी काय केले नाही, यावर एकदा खुली चर्चा होऊन जाऊ द्या, असंही आव्हानही प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना दिलं.

मनोज जरांगे काय म्हणाले होते?

भाजप नेते प्रसाद लाड यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांची जीभ घसरली. माझ्या नादी नको पडू, मनोज जरांगे हा जातीसाठी लढतो. जात विकून घर मोठं करणारी तुमची औलाद आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी लाड यांच्यावर केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT