uddhav thackeray and narayan rane  saam tv
मुंबई/पुणे

Narayan Rane On Uddhav Thackeray: यंदाचा मेळावा म्हणजे तमाशा; नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

यंदाचा मेळावा म्हणजे तमाशा होता, असा हल्लाबोल राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Narayan Rane On Uddhav Thackeray : मुंबईत शिवतीर्थावरील शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेला भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज, शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. यंदाचा मेळावा म्हणजे तमाशा होता, असा हल्लाबोल राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

शिवाजी पार्कवरील दसरा शिमग्यासारखा साजरा झाला. शिमग्याला शिव्या द्यायचे काम होते. पवित्र शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांनी शिव्या दिल्या गेल्या. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात वैचारिक बौद्धिक सोनं नव्हतं, असं नारायण राणेंनी म्हटलं. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे यांना इतरांवर टीका केली म्हणजे मोठे होता येते असे वाटते. आम्ही आमच्या नेत्यांबाबत कुणी बोललेलं ऐकूण घेणार नाहीत. तसेच तोंड बंद केले नाही आणि कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्याला तुम्ही जबाबदार राहाल, असा इशाराही त्यांनी दिला.

370 कलम अमित शहा यांनी हटवले आणि म्हणतात ते या राज्यातून त्या राज्यात फिरतात. नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून निवडून आलात आणि आता टीका करता का? असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला.

तुम्ही अपघाताने झालेले मुख्यमंत्री आहात. मराठी माणसांसाठी तुम्ही काय केले हे उद्धव ठाकरे यांनी सांगावे. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते आणि लोक मैदानातून बाहेर पडत होते. बाळासाहेब बोलायचे त्यावेळी सगळे लोक ऐकायचे, असं नारायण राणेंनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT