kirit somaiya SAAM TV
मुंबई/पुणे

Kirit Somaiya Viral Video : भाजप नेते किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण, मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल

Mumbai Police : मंगळवारी किरीट सोमय्या यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.

साम टिव्ही ब्युरो

सचिन गाड

Mumbai News :

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या प्रकरणी आता पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आता गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी खाजगी वृत्त वाहिनी आणि अनिल थत्ते यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली होती. (Latest News Update)

भादंवि ५०० (मानहानी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(ई) आणि ६७ (अ) अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे. याप्रकरणी मंगळवारी किरीट सोमय्या यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.

सोमय्या यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी याबाबत कारवाईची मागणी केली होती. पावसाळी अधिवेशनात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात व्हायरल व्हिडीओप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले होता. (Latest Marathi News)

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याप्रकरणी चौकशीची मागणी केली होती. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही. या व्हिडीओची सत्यता तपासावी आणि सखोल चौकशी करावी, असं सोमय्या यांनी म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री अ‍ॅक्टिव मोडमध्ये

Ganpatrao Deshmukh: आम्हाला 500 रुपये दिले म्हणून आम्ही आलो, गणपतराव देशमुख यांच्या पत्नीचा गंभीर आरोप|VIDEO

Pune: भावकीच्या वादातून तुंबळ हाणामारी, एकमेकांवर कोयत्याने सपासप वार; तिघे गंभीर जखमी; थरारक VIDEO

Maharashtra Politics : पुण्यात काँग्रेसला बसणार धक्का, ५ नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा

Mumbai Metro: मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पुढचे ७ दिवस या मार्गांवरील वेळापत्रकात बदल

SCROLL FOR NEXT