Devendra Fadnavis
Devendra Fadnavis  Saam Tv
मुंबई/पुणे

'विधानपरिषद निवडणूक कठीण आहे पण...'; देवेंद्र फडणवीसांनी केले भाजप आमदारांना मार्गदर्शन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सूरज सावंत

मुंबई : विधान परिषदेच्या १० जागेसाठी उद्या सोमवार २० जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी (MVA) आणि भाजप या दोन्ही गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडी व भाजपने (BJP) विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपने आमदारांची बैठक मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये आयोजित केली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. 'निवडणूक कठीण आहे पण विजय अशक्य नाही', असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला. (Devendra Fadnavis News In Marathi)

भाजपच्या बैठकीत काय झालं?

भाजप आमदारांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मार्गदर्शन केलं. 'निवडणूक कठीण आहे पण विजय अशक्य नाही', असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांना दिला.

'मतदान करताना कुठल्याही चुका करू नका. निवडणुकीसाठी एक एक मत महत्वाचे आहे. राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेतही एक एक महत्वाचे आहे. राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेतही सामना आपण जिंकणार आहोत', असेही फडणवीसांनी सांगितले. तसेच राज्यसभेच्या निवडणुकीवेळी केलेल्या अचूक कामगिरीचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये आयोजित केली होती. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत बैठकीची सुरुवात जय श्री रामच्या नाऱ्याने झाली. या बैठकीत आमदारांनी मार्गदर्शन मतदान कसे करायचे. मत बाद होऊ नये यासाठी काळजी घ्यावी हे देखील सांगितलं गेलं. विधान परिषदेची खरी लढत ही प्रसाद लाड आणि भाई जगताप यांच्यात होत आहे. या बैठकीवेळी प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या पत्नी निता लाड याही हॉटेलमध्ये उपस्थित आहेत. भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना अतिरिक्त मतांची गरज आहे. त्यामुळे भाजपने जय्यत तयारी केली आहे. तसेच भाजपच्या या बैठकीला गोंदीयाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल देखील उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: व्यवहारात सतर्कता बाळगा, सावधगिरीने काम करा; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: मंगळवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? वाचा राशिभविष्य

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

SCROLL FOR NEXT