Chitra Wagh Saam Tv
मुंबई/पुणे

Chitra Wagh: "लडेंगे और जितेंगे भी", दरेकरांवरील गुन्ह्यानंतर चित्रा वाघ यांचं ट्विट

भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई: राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. बोगस मजूर प्रकरणी दरेकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे (BJP Leader Chitra Wagh Tweet About Case Filed Against Pravin Darekar).

यावरुन आता भाजप (BJP) नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरु केलं आहे. हे अपेक्षितच होतं, असं ट्विट करत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. "लडेंगे और जितेंगे भी", असंही त्या म्हणाल्या.

चित्रा वाघ यांचं ट्विट-

प्रविण दरेकरांवर गुन्हा दाखल

प्रविण दरेकर यांनी मुंबै बँक (Mumbai Bank) निवडणुकीकरिता मजूर संस्थेअंतर्गत अर्ज दाखल करण्यात केला. या अगोदर देखील दरेकर मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच मुंबै बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्या प्रकरणी आम आदमी पक्षाने (AAP) आक्षेप घेत पोलिसामध्ये तक्रार केली होती. यानंतर आता प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी; भाजपमध्ये मोठा फेरबदल; अनेक नेत्यांची होणार उचलबांगडी, राजकीय उलथापालथ होण्यामागे कारण काय?

Maharashtra News Live Update: कराड शहर पोलिसांची मोठी कारवाई, 95.78 ग्रॅम एमडी ड्रग जप्त

Veen Doghatli hi Tutena: 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट! चिंगीच्या गरोदरपणाचं सत्य समोर; स्वानंदी मोडणार अंशुमनचं लग्न?

विषारी दारू प्रकरणात मृतांच्या कुटुंबांना ५ लाखांची मदत; फडणवीस सरकारची घोषणा

मुंबईत ८२ इमारती अतिधोकादायक; २७३६ रहिवाशांचे जीव धोक्यात

SCROLL FOR NEXT