Chitra Wagh Saam Tv
मुंबई/पुणे

कुचिक प्रकरण: भाजप नेत्या चित्रा वाघ यांची पुणे पोलीस करणार चौकशी

शिवसेना नेते रघुनाथ कुचिक प्रकरणामध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ यांची पुणे पोलीस चौकशी करण्याची शक्यता

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे: शिवसेना नेते रघुनाथ कुचिक प्रकरणामध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांची पुणे पोलीस चौकशी करण्याची शक्यता आहे. राज्य महिला आयोगाने पुणे (Pune) पोलिसांकडे याविषयी सूचना केली आहे. राज्य महिला आयोगाच्या (State Women Commission) अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पुणे पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. चित्रा वाघ या संबंधिमध्ये गुन्ह्याविषयी खोटी माहिती देऊन बदनामी करत असल्याची तक्रार कुचिक यांच्या मुलीने केली आहे. शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक हे सध्या जामीनावर असून या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. तरी देखील चित्रा वाघ या गुन्ह्याविषयी असबंध आणि खोटी माहिती माध्यमांना देत आहेत. अपमानजनक टीका करत आहेत.

हे देखील पहा-

यामुळे कुटुंबाची समाजामध्ये बदनामी होत असल्याचे कुचिक यांच्या मुलीने सांगितले आहे. या प्रकरणात फिर्यादी आणि चित्रा वाघ या जाणीवपूर्वक आणि संगनमताने या प्रकरणाची मीडिया ट्रायल चालवत आहेत. यामुळे या दोघींमधील संगनमताची चौकशी व्हावी आणि त्यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी रघुनाथ कुचिक यांच्या मुलीने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये केली आहे. प्रसार माध्यमावरून सुरू असलेले खोटे आणि अपमानजनक आरोप करू नये, याकरिता प्रतिबंधात्मक आदेश काढण्यात यावे, अशी मागणी केली आहे. या तक्रारीवरून राज्य महिला आयोगाने पुणे पोलिसांना (Police) तपास करण्याच्या सूचना दिले आहेत.

कुचिक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा

शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यामधील शिवाजीनगर (Shivajinagar) पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका २४ वर्षीय तरुणीने कुचिक यांच्या विरोधामध्ये तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे (marriage) आमिष दाखवून कुचिक यांनी शारिरीक संबंध ठेवले आणि गर्भवती राहिल्यावर जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले असल्याचा, आरोप या तरुणीने तक्रारीमध्ये केला होता. त्यानुसार पोलिसांनी कुचिक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील विविध भागात ATS पथकांची धाड

सोलापूर हादरले! प्रपोज नाकारल्याचा राग, महिलेच्या लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांत पतीचा खून, कोयत्याने सपासप वार

Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24K, 22K, 18K सोन्याचे दर वाढले, पाहा आजचे भाव

Diabetes Recipe : मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चटपटीत चटणी एकदा खाऊन तर पाहा, चवीला भारी अन् आरोग्याला फायदेशीर

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

SCROLL FOR NEXT