Bavankule- Aditya thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Exclusive Interview: '...तर आदित्य ठाकरेंना आज वणवण फिरावं लागलं नसतं', बावनकुळेंनी ठाकरेंच्या चुकांचा पाढाच वाचला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:ला १८ महिने घरात कोंडून घेतलं होतं.

प्रविण वाकचौरे, Prachee kulkarni

Chandrashekhar Bavankule: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:ला १८ महिने घरात कोंडून घेतलं होतं. मुख्यमंत्री मंत्रालयात दिसत नव्हते. त्यांच्या खिशाला पेन दिसत नव्हता. म्हणून त्यांचे आमदार घाबरले होते. ठाकरेंसोबत राहिलो तर आमचं डिपॉझिटही जप्त होईल, अशी भीती बाहेर पडलेल्या आमदारांना होती, असा आरोप चंद्रशेखर बानवकुळे यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे आज राज्यभर दौरे करत आहेत, त्यावेळी मंत्रालयात बसून आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता, तर त्यांना आज वणवण फिरावं लागलं नसतं. साम टीव्हीशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या ट्रॅपमध्ये अडकले आणि मुख्यमंत्रीपदाची मागणी केली. त्यांच्या मुलाला त्यांना मंत्री करायचं होते. पण निसर्गाला ही युती मान्य नव्हती. त्यानंतर निसर्गाने बदला घेतला, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.

आदित्य ठाकरे आज राज्यभर फिरत आहेत. मात्र जेव्हा सरकार होतं तेव्हा अजित पवार सकाळी सात वाजेपासून रात्रीपर्यंत मंत्रालयात बसालये. आदित्य ठाकरे हे तेव्हा मंत्रालयात का नाही बसले. तुम्ही तुमचे आमदार, खासदार, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख हे तुम्ही मंत्रालयातून सांभाळले असते तर ही वेळ आज आलीच नसती, असंही त्यांनी म्हटलं.

सोन्याच्या चमचाने बदामाचं दूध पिणारे ते कार्यकर्ते आहेत. तुम्ही कधी ग्राऊंड लेव्हलला काम केलं पाहिलं नाही. सत्तेत असताना ज्या भूमिकेत तुम्ही होते तेव्हा पक्ष सांभाळला असता तर आज वणवण फिरण्याची गरज लागली नाही. मात्र उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंना जरी उपमुख्यमंत्री केलं असतं तरी ही जोडी राज्याने मान्य केली असती, असं बावनकुळे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

Tuesday Horoscope: पैशाच्या समस्या दूर होणार, या ५ राशींना घ्यावी लागणार काळजी? वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Pune Fort : मराठा साम्राज्याचा शेवटचा किल्ला तुम्ही पाहिलाय का? अनेक पर्यटकांच्या नजरेआड आहे 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Accident News: बेंगळुरूहून मुंबईकडे निघाली ट्रॅव्हल्स बस, साताऱ्यात ड्रायव्हर बदलला; सारोळे उड्डाणपुलाजवळ येताच मोठा अपघात

Maharashtra News Live Update: करडे घाटात गोळीबार; सराईत गुन्हेगार विशाल काळेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT