Eknath shinde and chandrakant patil  saam tv
मुंबई/पुणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैठकीला चंद्रकांत पाटील गैरहजर; पाटील अजूनही नाराज?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात विभागीय बैठक होणार आहे. या बैठकीला चंद्रकांत पाटील गैरहजर आहेत. त्यामुळे आता पुन्हा चंद्रकांत पाटील नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी पनवेल येथील भाजपच्या मेळाव्यात पाटील यांनी मुख्यमंत्री पदावरुन नाराजी व्यक्त केली होती. (Eknath Shinde Latest News)

भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पनवेल येथील मेळाव्यात आम्ही मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले आहे, असं वक्तव्य केले होते. आज या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे विभागाची बैठक बोलवली आहे. या बैठकीला चंद्रकांत पाटील गैरहजर आहेत. या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदारही हजर आहेत. त्यामुळे आता नाराजीच्या चर्चांना उधाण आले आहे.(Eknath Shinde Latest News)

पुणे विभागामध्ये कोल्हापुरचाही समावेश आहे. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील हे कोथरुडचे आमदार आहेत. पुण्यातील सर्व आमदार या बैठकीला उपस्थित आहेत, पण पाटील यांची उपस्थित नाहीत.

हे देखील पाहा

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे गट आणि भाजप एकत्र येत सरकार स्थापन केले. सरकार स्थापनेवेळी आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार अशी चर्चा होती, पण भाजपने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास सांगितले. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचे बोलले जात आहे.(Eknath Shinde Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT