Ashish Shelar News  Saam tv
मुंबई/पुणे

'तो' प्रश्न स्वतःच्या काकांना का विचारला नाही? अजित पवारांच्या सावरकरांवरील वक्तव्याला आशिष शेलारांचे प्रत्त्युत्तर|Ashish Shelar News

अजित पवार यांच्या टीकेला भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

Ashish Shelar News : 'सावरकर गौरव यात्रे'वरून अजित पवार यांनी सत्ताधारी भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांवर निशाणा साधला. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मुद्द्यावरूनही अजित पवार यांनी भाजप-शिंदे गटाला लक्ष्य केले होते. अजित पवार यांच्या या टीकेला भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Latest Marathi News)

अजित पवार यांच्या महाविकास आघाडीच्या 'वज्रमूठ' सभेतील टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप नेते आशिष शेलार म्हणाले, 'स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबतचा प्रश्न तुम्ही स्वत:च्या काकांना का विचारला नाही? यांनी स्वत:च्या काकांना विचारायचे नाही. ते १५ वर्ष मंत्री आणि मुख्यमंत्री होते. तसेच स्वत: आकांनाही प्रश्न का विचारला नाही? असाही सवार शेलार यांनी केला.

उद्धव ठाकरेंच्या छत्रपती संभाजीनगरच्या राड्यावरील वक्तव्यावरून आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आशिष शेलार म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरमधील राड्याबाबत ठोस पुरावा द्यावा, अन्यथा माफी मागा. समजामध्ये एका पक्षाबद्दल तेढ निर्माण करत असतील तर तो गुन्हा होऊ शकतो, त्यामुळे पुरावा द्या, अन्यथा माफी मागा नाहीतर कायदेशीर कारवाई करावी लागेल'.

'हिंदुत्व सोडल्याबद्दल उद्धव ठाकरे यांना माफ करणार नाही. स्वतः गुन्हे करायचे आणि स्वतःच्या मंत्र्यांची भरस्ताचार प्रकरणे बाहेर आली की ईडीला दोष द्यायचा. आम्ही प्रचार करायचा आणि विरोधकांना जिंकवा असे म्हटले तर यांची लोकशाही होते का? असाही सवाल करत शेलार यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

'गांधी हा एक विचार आहे , तो विचार संपवण्याचा एका मोठ्या राजकीय पक्षाचा प्रयत्न आहे , असं वक्तव्य करणाऱ्या रोहित पवार यांनाही आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं. ' रोहित पवार यांनी अभ्यास करण्याची गरज आहे. रोहित पवार तरुण आणि तडफदार आहेत, असेही शेलार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : जेजुरी अपघातातील मृतांचा आकडा वाढला

Pune Accident : वारीत पुन्हा भयंकर अपघात, भरधाव कारने वारकऱ्याला चिरडले, जागेवरच मृत्यू

Shocking : धक्कादायक! 'लाडकी बहीण' योजनेच्या पैशातून दागिन्यांचे आमिष; महिलेला पळवून नेऊन बलात्कार

'मंत्रिपद सोडायचं नसेल तर...', सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला मराठमोळ्या कलाकारांचा पाठिंबा; केंद्र सरकारला दिला 'हा' सल्ला

Healthy morning habits: चांगल्या आरोग्यासाठी सकाळच्या या ६ सवयी वेळीच बदला!

SCROLL FOR NEXT