Ashish Shelar and uddhav Thackeray  saam tv
मुंबई/पुणे

'अमित शाह यांना आव्हान करणे म्हणजे...'; आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

भाजप आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

साम टिव्ही ब्युरो

सूशांत सावंत

Ashish shelar News : भाजपचे मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तुम्ही १०० आमदार निवडून आणलेत का? अमित शाह यांनी १०० पेक्षा अधिक आमदार निवडून आणले. त्यांना तुम्ही आव्हान करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, अशा कठोर शब्दात भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. (Ashish shelar News In Marathi )

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये बुधवारी शिवसेनेची सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मुंबई महापालिका जिंकून दाखवण्याचे आव्हान दिले. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आशिष शेलार म्हणाले, 'स्वत:च्या ताकदीवर तुम्ही कधी सरकार आणले का ? उद्धव ठाकरे यांना आव्हान कुणी कुणाला द्यायचे याबद्दल आत्मचिंतन करण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे तुम्ही १०० आमदार निवडून आणलेत का? अमित शाह यांनी १०० पेक्षा अधिक आमदार निवडून आणले आहेत. त्यांना तुम्ही आव्हान करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, अशा शब्दात शेलार यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

दसरा मेळाव्याच्या निकालावर देखील आशिष शेलार यांनी भाष्य केले. शेलार म्हणाले, 'दसरा मेळाव्याच्या निर्णयाशी आमचा काय संबंध? ते प्रकरण शिंदे गट आणि पेंग्विन सेनेमध्ये होते. त्याचा आमच्याशी काय संबंध ? ज्यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तीच खरी शिवसेना आहे'.

वेदांता प्रकल्पाबाबत शेलार म्हणाले, 'आदित्य ठाकरे यांच्या पेंग्विनसेनेची भूमिका लोकांना भ्रमित करण्याची आहे. मराठी-गुजरातीचा वाद आणि द्वेष निर्माण करत आहेत. चहाच्या ऐवजी आणखीन काही घ्यायचं ठरवलं आहे असं दिसतंय. आदित्य ठाकरे हे धादांत खोटं बोलत आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Cancer: नेल एक्स्टेन्शन करत असाल तर सावधान! नखाखाली दिसणारी ही छोटी काळी रेघ ठरू शकते जीवघेण्या कॅन्सरची पहिली घंटा

Maharashtra News Live Update: समगा नदीला पूर, 15 गावांचा संपर्क तुटला

Soaked almonds benefits: रात्रभर दूधात भिजवून ठेवलेले बदाम खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतात?

Pune : शालेय विद्यार्थ्यांकडून भाजप नगरसेवकाचे पाय धुण्याचा प्रकार; फोटो व्हायरल, राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त

Raksha Bandhan 2026: २७ की २८ ऑगस्ट... यंदा राखी कधी बांधायची? भाऊ-बहिणीच्या सणाचा खरा शुभ मुहूर्त कोणता?

SCROLL FOR NEXT